या अँड्रॉईड युजर्संना झटका, कारण आता त्यांच्या फोनमध्ये बंद होणार गुगल क्रोम

| Updated on: Nov 02, 2023 | 5:19 PM

Google chrome Update : गुगल क्रोम वापरणाऱ्या काही युजर्सना आता यापुढे त्यांच्या फोनमध्ये हे ब्राऊझर वापरता येणार नाहीये. कारण कंपनीने अशा अँड्रॉईड फोनमध्ये गुगल क्रोम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी सोबतच नवीन अपडेट घेऊन येणार आहे.

या अँड्रॉईड युजर्संना झटका, कारण आता त्यांच्या फोनमध्ये बंद होणार गुगल क्रोम
chrome
Follow us on

Google chrome Update : जगात सर्वाधिक वापरले जाणारे मोबाईल ब्राउझर क्रोमने आणलेल्या नव्या अपडेटमुळे अँड्रॉइड यूजर्सची निराशा होणार आहे. कारण जर अँड्रॉइड यूजर्स जुन्या व्हर्जनवर चालणारे स्मार्टफोन वापरत असतील तर त्यांना त्यांचा फोन बदलावा लागणार आहे. कारण त्यात आता त्यांना Google Chrome ब्राउझर वापरता येणार नाहीये. गुगल क्रोमने अँड्रॉइड नौगटच्या जुन्या आवृत्तीचा सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Android 7.0 आणि Android 7.1 वर आधारित चालणाऱ्या फोनमध्ये यापुढे आता Google Chrome वापरता येणार नाहीये. हा बदल Google Chrome 120 रिलीझ झाल्यानंतर लागू होईल, जो 6 डिसेंबर रोजी स्थिर रिलीझ चॅनेलला हिट करेल आणि Chrome ची नवीन आवृत्ती असेल.

कोणत्या फोनमध्ये सपोर्ट बंद होणार

गुगलने जुन्या फोनमध्ये आपल्या ब्राउझरचा सपोर्ट समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून नवीन आवृत्तीवर अधिक आणि चांगले लक्ष केंद्रित करता येईल. चांगली गोष्ट अशी आहे की Android 7.0 किंवा Android 7.1 सह वापरले जाणारे स्मार्टफोन आणि उपकरणे खूप कमी आहेत. एकूण युजर्सपैकी केवळ 2.6% असे युजर आहेत जे हा स्मार्टफोन वापरत आहेत.

Google Chrome होणार अपडेट

नव्या अपडेटसह क्रोम ब्राउझरमध्ये बरेच बदल केले जाणार आहेत आणि त्यात अनेक अपग्रेड होणार आहेत. काही वेबसाईट सध्या लोड करण्यात समस्या येत आहे त्या अधिक चांगल्या प्रकारे लोड होतील.

गुगल क्रोममध्ये घेता येणार AI चा आनंद

2008 मध्ये लॉन्च झाल्यानंतर, गुगल क्रोम गेल्या 15 वर्षांत जगातील सर्वात जास्त वापरला जाणारा वेब ब्राउझर बनला आहे. याशिवाय, इतर अनेक ब्राउझर त्याच्या क्रोमियम इंजिनवर देखील कार्य करतात.