मुंबई : सध्या सर्वांत जास्त वापरला जाणारा नेट ब्राउजर म्हणजे गूगल क्रोम (Google Chrome) विंडोज किंवार अँड्रॉईड सगळ्यात क्रोमच वापरला जातो. लॅपटॉपासून फोनपर्यंत सगळीकडे हाच ब्राउजर वापरला जातो. याशिवाय Vivaldi, Opera, Microsoft Edge आणि Brave Browser हे ब्राउजरही गूगलच्या क्रोमियम ब्राउजरच्या इंजिनावरच चालतात. आता या सर्वांमध्ये एक टेकनिकल प्रॉब्लेम झाल्याचे समोर आले आहे. काही हॅकर्स या गोष्टीचा चूकीचा फायदाही घेऊ शकतात. सुदैवाने गूगलने त्वरीतच या प्रॉब्लेमला नीट केलं असलं तरी युजर्सना एख छोटीशी गोष्ट करायची आहे. जेणेकरुन ते आपला डाटा लॉस किंवा लीक होण्यापासून वाचू शकतात.
गूगलने प्रॉब्लेम नीट केला असला तरी युजर्सना वापरत असलेला ब्राउजर अपडेट करण्याची गरज आहे. कारण व्यवस्थित तकेलेला नवा ब्राउजर हा जुना ब्राउजर अपडेट केल्याशिवाय वापरता येणार नाही. दरम्यान हे करणे अत्यंत गरजेचे आणि त्वरीत असून असे न केल्यास हॅकर्स संबधित ब्राउजरच्या मदतीने सर्व मोबाईल डाटा लीक करु शकतात.
गूगलने काय सांगितल?
कंपनीने त्यांच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, संबधित बग हा सुरुवातीपासूनच ब्राउजरच्या वापरात होता. जीरो-डे वल्नरबिलिटी (0-day) असं या बगचं नाव असून हा एक प्रकारचा तांत्रिक प्रॉब्लेम आहे. याच्याच मदतीने हॅकर्स ब्राउजरला हॅक करु शकतात. या बगला डार्क वेबवर लाखों डॉलर्सना विकलं जातं.
काय करावं लागेल?
जे यूजर्स ब्राउजर अपडेट करणार नाहीत त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे सर्वात आधी ब्राउजर अपडेटेड आहे का? हे पाहण्यासाठी यूजर्सना Settings मध्ये जाऊ Help वर क्लिक कराव लागेल. त्यानंतर About Google Chrome मध्ये जावं लागेल. त्याठिकाणी जर 91.0.4472.164 या त्याच्या नंतरचे वर्जन असेल तर तुमचा ब्राउजर सुरक्षित आहे. अन्यथा तुम्हाला संबधित ब्राउजर अपडेट करावा लागेल.
संबंधित बातम्या :
गूगल पिक्सेल फोन वापरकर्त्यांसाठी खूशखबर, फोनमध्ये आले नवीन बॅटरी बचत फिचर
या स्मार्ट फ्रिजसह आपले स्वयंपाकघर बनवा आधुनिक, सॅमसंगने लाँच केला थ्री डोअर रेफ्रिजरेटर
(Google Chrome Users Alert Do Update ur Browser as soon as possible not to loose your data)