आता गुगल मॅप सांगणार रिक्षा भाडे
नवी दिल्ली : प्रसिद्ध अशा गुगल कंपनीने आपल्या गुगल मॅप अॅपमध्ये लवकरच एक नवीन फीचर लाँच करणार असल्याची घोषणा सोमवारी केली. ज्यामुळे दिल्लीतील प्रवाशांना आता गुगल मॅपवर ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट मोड’ या पर्यायामध्ये आता ऑटो रिक्षाचा पर्यायही दिसेल. गुगलने सांगतले की, या नव्या फीचरमध्ये प्रवाशांना आता डेस्टिनेशनपर्यंत पोहचण्याचा उत्तम मार्ग तसेच ऑटो रिक्षाचे भाडेही पाहता येणार […]
नवी दिल्ली : प्रसिद्ध अशा गुगल कंपनीने आपल्या गुगल मॅप अॅपमध्ये लवकरच एक नवीन फीचर लाँच करणार असल्याची घोषणा सोमवारी केली. ज्यामुळे दिल्लीतील प्रवाशांना आता गुगल मॅपवर ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट मोड’ या पर्यायामध्ये आता ऑटो रिक्षाचा पर्यायही दिसेल. गुगलने सांगतले की, या नव्या फीचरमध्ये प्रवाशांना आता डेस्टिनेशनपर्यंत पोहचण्याचा उत्तम मार्ग तसेच ऑटो रिक्षाचे भाडेही पाहता येणार आहे.
नवीन फीचर गुगल मॅप, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि कॅब मोडवर दिसेल. विशेष म्हणजे या अॅपमधील रस्ते आणि भाडे दिल्ली ट्राफिक पोलीसांनी बनवलेल्या नियमांवर आधारीत आहे.
“सध्या नवीन ठिकाणी जाताना प्रवाशांना बऱ्याचदा खूप भाडे द्यावे लागते आणि रस्ता माहित नसल्याने वेळही वाया जातो. कारण त्यांना डेस्टिनेशनच्या मार्गाचा अंदाज नसतो”. असं गुगल मॅप्सचे प्रोडक्ट मॅनेजर विशाल दत्त यांनी सांगितले.
ते पुढे म्हटले, “या फीचर्समुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, तसेच त्यांना रिक्षाचे भाडे नव्या फीचर्सच्या माध्यमातून समजणार असल्याने अधिक पैसेही मोजावे लागणार नाही”.
गुगलने चालू केलेल्या या फीचरचा नक्कीच फायदा प्रवाशांना होणार आहे. काही रिक्षांकडून प्रवाशांची लूटही केली जाते. मात्र गुगलच्या या नवीन अॅपमुळे प्रवाशांना सोयीचे जाईल असा विश्वास गुगलच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. हा अॅप दिल्लीशिवाय अजून कोणत्या शहरात उपलब्ध आहे का या बाबतची माहिती गुगलने अजून दिलेली नाही. मात्र हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला मॅप अपडेट करावा लागणार आहे.