विना इंटरनेट पण लोकेशन दाखवणार Google Maps, सोपी पद्धत जाणून घ्या

Google Maps | अनेकदा शहरापासून, गावापासून दूर डोंगरखोऱ्याकडे गेल्यावर, अथवा ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या भेडसावते. अशावेळी नवख्या व्यक्तीला Google Maps वापरता येत नाही. पण विना इंटरनेट पण तुम्हाला गुगल मॅप रस्ता दाखवू शकतो, आश्चर्य वाटले ना? मग ही ट्रिक आणि टिप्स जरुर फॉलो करा.

विना इंटरनेट पण लोकेशन दाखवणार Google Maps, सोपी पद्धत जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jan 26, 2024 | 11:35 AM

नवी दिल्ली | 26 January 2024 : नवीन रस्त्यावरुन जाताना, नवीन शहराकडे, नवीन ठिकाणी जाताना आता गुगलचे नॅव्हिगेशन ऐप Google Maps चा जास्त उपयोग होतो. तसेही अनेक जण, आपलं तोंड का भांडलंय, असं म्हणतं विचारपूस करत निघातत. पण निर्मनुष्य रस्त्यावर जास्त कसरत होते. अशा वेळी गुगल मॅप उघडावे लागते. पण इंटरनेटने धोका दिला, तर ताप वाढतो. अशावेळी विना इंटरनेट सुद्धा तुम्हाला गुगल मॅप अचूक रस्ता शोधण्यासाठी मदत करते. हे सीक्रेट तुम्हाला माहिती नसेल तर या ट्रिक आणि टिप्सनेत तुम्ही अशा प्रकारे तुमचे इच्छित स्थळ गाठू शकता. काय आहे हा सोपा उपाय?

Offline Maps

तुम्ही गुगल मॅप लावून रस्त्यावरुन वाहन चालवत असाल आणि अचानक नेटवर्कची अडचण आली तर? मग काय तुम्हाला वाटेल या आडवळणी रस्त्यावर आता कोणाची वाट पाहत किती वेळ ताटकळायचं, नाही का. पण गुगल मॅपमध्ये एक सीक्रेट फीचर आहे. तुम्ही विना इंटरनेट सुद्धा हे फीचर उपयोगात आणू शकता. पण त्यासाठी हे काम इच्छितस्थळी निघणाऱ्यापूर्वी आठवणीने करावे लागणार आहे. तुम्हाला Google Maps मध्ये Offline Maps हे फीचर मिळते. हे फीचर विना इंटरनेट पण काम करते. हे फीचर कसे वापरात आणायचे हे पाहुयात..

हे सुद्धा वाचा

Google Maps without Internet चा असा करा वापर

  1. सर्वात अगोदर मोबाईलमध्ये गुगल मॅप्स एप ओपन करा. एप उघडल्यावर उजव्या बाजूला वरती प्रोफाईल पिक्चरच्या आयकॉनवर क्लिक करा.
  2. या पिक्चरवर टॅप केल्यानंतर अनेक पर्याय समोर येतील. याठिकाणी तुम्हाला Offline Maps चा पर्याय दिसेल
  3. ऑफलाईन मॅप्सचा पर्याय क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला Select Your Own Map हा पर्याय दिसेल
  4. या पर्यायावर तुम्हाला इच्छित स्थळ या बॉक्समध्ये आणावे लागेल. त्यामुळे एरियाचा मॅप डाऊनलोड होईल
  5. स्क्रीनवर तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय मिळेल. पण त्यासाठी मोबाईलमध्ये फ्री स्पेस लागेल
  6. मॅप्स डाऊनलोड झाल्यानंतर नेटवर्क नसले तरी, विना इंटरनेट तुम्हाला या फीचरच्या मदतीने इच्छित स्थळ गाठता येईल
Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.