Google Pixel 3a आणि Pixel 3a XL लाँच, पाहा किंमत…
मुंबई : गुगलने आपल्या वार्षिक इव्हेंट 2019 मध्ये Google Pixel 3a आणि Pixel 3a XL असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यंदा गुगलने स्मार्टफोनच्या किंमतीची काळजी घेत Google Pixel 3a आणि Pixel 3a XL बाजारात उतरवले आहे. भारतात Pixel 3a आणि Pixel 3a XL ची विक्री 15 मे पासून सुरु होणार आहे. भारतात Pixel 3a […]
मुंबई : गुगलने आपल्या वार्षिक इव्हेंट 2019 मध्ये Google Pixel 3a आणि Pixel 3a XL असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यंदा गुगलने स्मार्टफोनच्या किंमतीची काळजी घेत Google Pixel 3a आणि Pixel 3a XL बाजारात उतरवले आहे. भारतात Pixel 3a आणि Pixel 3a XL ची विक्री 15 मे पासून सुरु होणार आहे. भारतात Pixel 3a स्मार्टफोनची किंमत 39 हजार 999 रुपयांपासून सुरु होईल.
Google Pixel 3a आणि Pixel 3a XL चा कॅमेरा
दोन्ही फोनमध्ये 12.2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कॅमेरासोबत ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलायजेशन मिळणार. तसेच लो-लाईट फोटोग्राफी, एचडीआर प्लस, पोट्रेट मोड, सुपर रिजोल्यूशन झूम आणि टॉप शॉट सारखे फीचर दिले आहेत.
Google Pixel 3a आणि Pixel 3a XL चे स्पेसिफिकेशन
फोनचे स्पेसिफिकेशन पाहिले तर, दोन्ही फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर मिळणार आहेत. तसेच Pixel 3a XL मध्ये 6 इंचाचा आणि Pixel 3a मध्ये 5.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. दोन्ही फोनमध्ये ड्युअल सिम आहे, यामध्ये ई-सिमची सुविधाही आहे. भारतात रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन कंपनी ई-सिमची सुविधा देतात. Pixel 3a मध्ये 3000mAh बॅटरी आणि Pixel 3a XL मध्ये 3700 mAh बॅटरी दिली आहे. दोन्ही फोनमध्ये अँड्रॉईड क्यू 10.0 व्हर्जन मिळणार आणि कंपनी 3 वर्षापर्यंत सिक्युरिटी अपडेट देणार आहे.
Google Pixel 3a आणि Pixel 3a XL चा किंमत
या स्मार्टफोनची किंमत पाहिली तर, Google Pixel 3a ची किंमत 39 हजार 999 रुपये आणि Pixel 3a XL ची किंमत 44 हजार 999 रुपये आहे. दोन्ही फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोअरेज व्हेरिअंटमध्ये मिळत आहे. भारतात दोन्ही फोन 15 मेपासून उपलब्ध होणार आहेत. या फोनसाठी प्री-बुकिंग फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. Google Pixel 3a आणि Pixel 3a XL ब्लॅक आणि व्हाईट रंगामध्ये खरेदी करु शकता. फोनसोबत तीन महिन्यासाठी यूट्यूब म्यूझिकचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.