Google Play Store मधून ‘हे’ अॅप हटवलं, लाखो युजर्सवर मालवेअर अटॅक

गुगल प्ले स्टोअरने (Google Play Store) आतापर्यंत अनेक अॅप आपल्या प्ले स्टोअरमधून हटवला आहे. जे अॅप युजर्ससाठी धोकादायक आहेत असे अॅप गुगलकडून तातडीने हटवले जातात.

Google Play Store मधून 'हे' अॅप हटवलं, लाखो युजर्सवर मालवेअर अटॅक
Follow us
| Updated on: Aug 29, 2019 | 9:36 AM

मुंबई : गुगल प्ले स्टोअरने (Google Play Store) आतापर्यंत अनेक अॅप आपल्या प्ले स्टोअरमधून हटवला आहे. जे अॅप युजर्ससाठी धोकादायक आहेत असे अॅप गुगलकडून तातडीने हटवले जातात. नुकतेच गुगलने कॅम स्कॅनर (CamScanner) अॅप प्ले स्टोअरमधून हटवलेला आहे. कारण या अॅपने अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये मालवेअर अटॅक केला आहे. त्यामुळे लाखो अॅप युजर्सच्या फोनमध्ये विना परवानगी अॅप डाऊनलोड होत आहे. जर तुमच्या फोनमध्येही हे अॅप असेल तर तातडीने डिलीट करा.

काय आहे CamScanner?

CamScanner एक डॉक्युमेंट स्कॅनिंग अॅप आहे. हे अॅप खूप प्रसिद्ध आहे आणि 10 कोटींपेक्षा अधिक लोकांनी हे अॅप डाऊनलोड केला आहे. जर तुम्हाला कोणते डॉक्यूमेंट किंवा फोटो स्कॅन करायचा असेल, तर या अॅपच्या माध्यमातून तुम्ही स्कॅन करु शकता. धावपळीच्या जगात वेळ आणि मेहनत वाचवण्यासाठी हे अॅप स्कॅनिंगसाठी उपयोगी आहे.

Kaspersky Lab नुसार, गुगल प्ले स्टोअरवर CamScanner अॅपमध्ये काही त्रुटी जाणवल्या आहेत. अॅपमध्ये हार्मफुल असे बदल आले आहेत. त्यामुळे युजर्सच्या परवानगी शिवाय फोनमध्ये जाहिरात दिसत आहेत आणि अॅपही ऑटोमॅटिक डाऊनलोड होत आहेत.

Camscanner अॅपमध्ये ट्रोजन ड्रॉपरचा समावेश आढळून आला आहे. ट्रोजन हा एक धोकादायक व्हायरस आहे, जो तुमच्या सर्व सिस्टमचा अॅक्सेस घेऊ शकतो. यानंतर हॅकर तुमच्या फोनचं लॉक, सोशल अकाऊंट, बँक डिटेल किंवा इतर पर्सनल फोटो आणि व्हिडीओ सर्व काही अॅक्सेस करु शकतो, असं गुगलने सांगितले आहे.

Google Play Store मधून काही वेळासाठी हे अॅप हटवण्यात आलं आहे. मालवेअर असल्यामुळे युजर्सचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. दरम्यान, या अॅपचे पेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.