गुगलने 11 धोकादायक अॅप प्ले स्टोअरमधून हटवले, युझर्सलाही तातडीने हटवण्याचा सल्ला
स्मार्टफोनच्या माध्यमातून हॅकर्स लोकांची फसवणूक (Google remove fake apps in store) करतात.
मुंबई : स्मार्टफोनच्या माध्यमातून हॅकर्स लोकांची फसवणूक (Google remove fake apps in store) करतात. गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप आहेत ज्यांच्या माध्यमातून युझर्सचा स्मार्टफोन हॅक करतात. गुगल प्रत्येकवेळी असे संशयित अॅप आपल्या प्ले स्टोअरमधून हटवतात आणि त्यावर बॅन (Google remove fake apps in store) करतात.
गुगलने 11 अॅप प्ले स्टोअरमधून हटवले आहेत. हे अँड्रॉईड अॅप थेट युझर्सच्या बँक खाते हॅक करु शकतात. ज्या माध्यमातून कधी-कधी क्रेडिट-डेबिट कार्डमधून पैसेही कट होऊ शकतात आणि युझर्सला समजतही नाही. तसेच यामधून युझर्सच्या परवानगीशिवाय त्यांच्या फोनमधून प्रीमिअम सर्व्हिससाठी सब्सक्राईब केले जाते.
गुगलकडून हे अॅप हटवण्यात आले आहे. जर तुम्ही हे अॅप वापरत असाल तर कृपया डिलिट करा.
Cheery Message (दोन वेगवेगळे अॅप)
Relaxation Message
Memory Game
Loving Message
Friend SMS
Contact Message
Compress Image
App Locker
Recover File
Remind Alarm – Alarm & Timer & Stopwatch App
2017 पासून गुगलचे या अॅपवर लक्ष होते. हे सर्व अॅप जोकर मालवेअरपासून इन्फेक्टेड आहेत. या अॅपला 2017 ला गुगलने ट्रॅक केले होते. हे सर्व अॅप अनेक वर्षांपासून गुगलच्या प्ले स्टोअर प्रोटेक्शनच्या नजरेतून स्वत: चा बचाव करत आहेत. युझर्सने किमान पाच लाख वेळा हे अॅप डाऊनलोड केले आहेत. आता युझर्सलाही हे अॅप डिलिट करण्यास सांगण्यात आले आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
या वर्षाच्या सुरुवातीला गुगलने 1700 अॅपला गुगल प्ले स्टोअरमधून हटवले होते. हे सर्व अॅप जोकर मालवेअरला इन्फेक्टेड होते.
कशा प्रकारे हल्ला करतो जोकर मालवेअर स्मार्टफोनवर?
बऱ्याचदा या अॅपचा वापर करत असताना अचानक जाहिरात येते. ज्यावर आपण नकळत क्लिक करतो. त्यानंतर हा मालवेअर अॅक्टिव्ह होतो आणि मालवेअर युझर्सच्या एसएमएसचा अॅक्सेस घेतो. तसेच ओटीपीच्या माध्यमातून होणारे पेमेंट युझर्सच्या परवानगीशिवाय बँकेचे ट्रॅन्जेक्शन करतो आणि याची माहिती युझर्सलाही होत नाही.
संबंधित बातम्या :
Breaking News | भारतीय लष्कराचा मोठा निर्णय | 15 जुलैपर्यत 89 अॅप हटविण्याचे आदेश
‘झूम’ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप सुरक्षित नाही, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून धोक्याचा इशारा