नववर्षात Google Stadia मध्ये चार नव्या गेमचा समावेश, किंमत काय?
गूगलच्या गेम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म स्टेडिया (Google Stadia) वर येत्या वर्षात नवीन चार गेम्सचा समावेश होणार आहे. (Google Stadia Add Four New Games)
नवी दिल्ली : गूगलच्या गेम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म स्टेडिया (Google Stadia) वर येत्या वर्षात नवीन चार गेम्सचा समावेश होणार आहे. 9 टू 5 च्या गूगल रिपोर्टच्या माहितीनुसार, गूगल स्टेडियामध्ये ऐरी अँड सिक्रेट ऑफ सिजन्स, फिगमेंट, एफ 1 2020 आणि हॉटलाईन मियामी या गेमचा समावेश आहे. (Google Stadia Add Four New Games)
यातील फिगमेंट हा गेमची किंमत 19.99 डॉलर म्हणजेच 1 हजार 470 रुपये इतकी आहे. सध्या या गेमच्या किंमतीवर डिस्काऊंट आहे. त्यामुळे त्याची किंमत 11.99 डॉलर म्हणजे 882.12 रुपये इतकी आहे. या गेमच्या सीरिजमध्ये एफ 1 2020 ची किंमत सर्वाधिक म्हणजे 59.99 डॉलर म्हणजे भारतीय किंमतीनुसार 4 हजार 413 रुपये इतकी आहे. मात्र सध्या डिस्काऊंटमध्ये हा गेम केवळ 2 हजार 206 रुपये उपलब्ध आहे.
या सोबतच ऐरी अँड सीक्रेट ऑफ सीजन्स आणि हॉटलाईन मियामी या दोन्ही गेमची किंमत अनुक्रमे 39.99 डॉलर (2942 रुपये) आणि 9.99 डॉलर (734 रुपये) इतकी आहे.
सध्या गूगलच्या स्टेडिया प्रोच्या सबस्क्रिप्शनच्या हिस्साच्या रुपात 30 हून अधिक गेम उपलब्ध आहे. ज्याची किमत कमीत कमी 740 रुपये आहे. गूगल स्टेडियामध्ये असेसिन्स क्रीड ओडीसे, डेस्टिनी 2: द कलेक्शन, जिल्ट, जस्ट डांस 2020, काइन, मोर्टल कॉम्बेट 11, रेड डेड रीडेम्प्शन 2, थम्पर, टॉम्ब राइडर : डेफीनिटिव एडिशन, राइज ऑफ द टॉम्ब राइडर, शैडो ऑफ द टॉम्ब राइडर, या गेमचा समावेश आहे.
त्यानंतर अटैक ऑन टाइटन : फाइनल बेटल 2, फार्मिग सिमुलेटर 2019, फाइनल फैंटेसी एक्सवी, फुटबाल मैनेजर 2020, ग्रिड 2019, मेट्रो एक्सोडस, एनबीए 2के20, रेज 2, ट्रायल्स राइजिंग और वॉल्फेंस्टीन : यंगब्लड या गेमचा समावेश आहे. (Google Stadia Add Four New Games)
संबंधित बातम्या :
Year Ender 2020 : ‘हे’ आहेत 6000mAh क्षमतेची बॅटरी असणारे या वर्षातले टॉप 3 स्मार्टफोन
एकदा चार्ज करा, 40 दिवस बॅटरी टिकणार, Tecno Spark 6 Go भारतात लाँच