आता Google अॅपवरही इंस्टाग्राम आणि TikTok व्हिडीओ, लवकरच नव फीचर
गुगल आपल्या मोबाईल अॅपसाठी एक नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या फिचरमुळे गुगल युजर्सलाही टिकटॉक आणि इंस्टाग्रामचे व्हिडीओज पाहता येणार आहे.
मुंबई : गुगल आपल्या मोबाईल अॅपसाठी एक नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या फिचरमुळे गुगल युजर्सलाही टिकटॉक आणि इंस्टाग्रामचे व्हिडीओज पाहता येणार आहे. गुगलने यासाठी आपल्या अॅपमध्ये एक डेडीकेटेड कॅरसेल देण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. यामुळे युजर्सला आपल्या आवडीनुसार, व्हिडीओ पाहता येणार आहेत. गुगलने Google Discover सेक्शनमध्ये या ‘शॉर्ट व्हिडीओ’ फीचरला अॅड केलंय. यात युजर्सला आपल्या आवडीनुसार व्हिडीओ पाहता येणार आहेत. याशिवाय काही अँड्रॉईड डिव्हाईस होम स्क्रीनवरही ही सुविधा देण्यात येणार आहे (Google testing new feature for short videos of TikTok and instagram).
शॉर्ट व्हिडीओज कॅरसेल ऑक्टोबर 2020 मध्ये लाँच झालेल्या गुगल स्टोरीजपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. हे फीचर गुगल सर्च अॅपनवर रोलआऊट केलं होतं. शॉर्ट व्हिडीओ कॅरसेलचा मुख्य उद्देश इतर प्लॅटफॉर्मवरुन व्हिडीओ एकत्रं करणे हा आहे. यात गुगलचा स्वतःचा शॉर्ट-फॉर्म व्हिडीओ प्रोजेक्ट Tangi, Trell आणि YouTube सारख्या अॅप्सच्या व्हिडीओचाही समावेश असेल. याशिवाय येथे टिकटॉक आणि इंस्टाग्रामचे व्हिडीओही असतील.
TechCrunch च्या रिपोर्टनुसार हे कॅरसेल फीचर युजर्सकडून कोणताही टॉपिक सर्च केल्यानंतर दिसणार आहे. जर एखाद्या युजरने त्या व्हिडीओवर क्लिक केलं तर तुम्हाला त्या अॅपच्या वेब व्हर्जनवर नेलं जाईल. मोबाईलमध्ये हे अॅप इंस्टॉल केल्यानंतरही ते अॅपवर घेऊन जाणार नाही. गुगलचा मुख्य उद्देश युजर्सला आपल्या अॅपवर टिकवून ठेवणं हा आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा कोणताही युजर संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर रिटर्न बटनावर क्लिक करेल तेव्हा तो पुन्हा जेथे व्हिडीओ पाहत होता तेथेच जाईल.
गुगलच्या एका प्रवक्त्यांनी याबाबत दुजोरा दिलाय. ते म्हणाले, “गुगल मोबाईल डिव्हाईसवर हे फीचर टेस्ट करत आहे.” असं असलं तरी गुगलच्या प्रवक्त्यांनी या फिचरवर पुढे काय होणार यावर बोलणं टाळलं.
हेही वाचा :
सर्चमध्ये भलतीचं उत्तरं, गुगलला कोर्टात खेचण्याच्या पाकिस्तानच्या हालचाली
Google Pixel 6 मध्ये खास अंडर डिस्प्ले कॅमरा दिसणार? स्मार्टफोनच्या पेटंट डिझाईनची जोरदार चर्चा
नववर्षात Google Stadia मध्ये चार नव्या गेमचा समावेश, किंमत काय?
Google testing new feature for short videos of TikTok and instagram