Google Down : जगभरात इंटरनेटचा वेग मंदावला, सर्च करताना त्रास होऊ लागला, नेमकं काय झालं? जाणून घ्या…
Google Down : ट्विटरवर येणाऱ्या मेसेजच्या माध्यमातून व्हिएतनाम, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि स्पेनमधील यूजर्सना गुगल डाउन झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, या मागचे नेमके कारण समोर आलेले नाही.
मुंबई : जगभरातून गुगल (Google) डाउन होत असल्याच्या बातम्या येत आहेत. शोध घेण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी लोक सोशल मीडियावर (Social Media) करत आहेत. ही समस्या भारतातील वापरकर्त्यांनाही होत आहे. भारतासह (India) जगभरातील लोक या समस्येनं त्रस्त झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील वापरकर्तेही गुगल डाउन होत असल्याच्या तक्रारी करत आहेत. Downdecetor.com या वेबसाइटनुसार, जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांनी गुगल डाउन होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या वेबसाइटवर 40 हजारांहून अधिक लोकांनी तक्रारी केल्या आहेत. वापरकर्त्यांनी सांगितले की Google पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील विविध देशांतील लोक गुगल डाउन होत असल्याच्या तक्रारी करत आहेत. गुगल डाउन असताना ट्विटरवर संदेशांचा पूर आला आहे. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की त्यांना सतत शोधात 500 त्रुटी येत होत्या. यूजर्सच्या म्हणण्यानुसार त्यांना काही काळ गुगल डाउन असण्याची समस्या होती पण नंतर ती दूर झाली.
Downdecetor.comचं ट्विट
User reports indicate Google is having problems since 9:12 PM EDT. https://t.co/MK35emuk7T RT if you’re also having problems #Googledown
— Downdetector (@downdetector) August 9, 2022
गुगलचं ट्विट
Hi Amanda. The Google Workspace Status dashboard (https://t.co/hWKKeG70F3) doesn’t show any outages. Could you tell us more about what seems to be happening with your Gmail address? We’d be happy to help.
— Gmail (@gmail) August 9, 2022
युजर्सना हा मेसेज दिसत
युजर्सना एक मॅसेज गुगलवर सर्च करताना दिसत आहे. 500 एरर मेसेज दिसत आहेत. लोकांनी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन कंपनीची तक्रारही केली आहे. मात्र, कंपनीच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजल्यापासून, वापरकर्त्यांनी गुगल डाउन झाल्याची तक्रार करण्यास सुरुवात केली, तरीही अर्ध्या तासात समस्या कमी होऊ लागल्या.
सोशल मीडियावर ट्विटचा पूर
Never experienced a Google search outage before… ? pic.twitter.com/5hksKw7hJp
— Rachael Piotrowski (@RachaelPiotPR) August 9, 2022
गुगल कोणत्या देशांमध्ये बंद?
ट्विटरवर येणाऱ्या मेसेजच्या माध्यमातून व्हिएतनाम, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि स्पेनमधील यूजर्सना गुगल डाउन झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, या घसरणीमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. पण हळूहळू वेगवेगळ्या देशांतून गुगलच्या सेवा पुन्हा सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत.
यूजर्सच्या म्हणण्यानुसार त्यांना काही काळ गुगल डाउन असण्याची समस्या होती पण नंतर ती दूर झाली. तर काहींना अडचण येतंच आहे.