देशात रस्त्यांचे मजबूत जाळे विणण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग, समृद्धी, ग्रीन वे यामुळे दळणवळणाला गती आली आहे. झटपट एका शहरातून दुसरे शहर गाठता येणे शक्य झाले आहे. वेळ आणि इंधनाची मोठी बचत होत आहे. पण त्यासाठी नागरिकांना खिसा खाली करावा लागतो. त्यांना टोल टॅक्स भरावा लागतो. दूरच्या प्रवासात तर टोल टॅक्समुळेच मोठा भूर्दंड सहन करावा लागतो. अशावेळी Google Maps मधील एक सीक्रेट फीचर तुमच्या मदतीला येऊ शकते. त्याचा खुबीने वापर तुमची आर्थिक बचत करु शकते.
Google Maps Tips : असा करा वापर या सीक्रेट फीचरचा
गुगलचे पैसे वाचविणारे फीचर
तुम्ही गुगल मॅप्सचा थ्री डॉटवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील. यामधील पहिल्या Options या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला Avoid Tolls हा पर्याय समोर दिसेल. तुम्ही जेव्हा या सीक्रेट फीचरला ऑन कराल. गुगल मॅप्स तुम्हाला असा रस्ता दाखवेल, जिथे तुम्हाला टोल नाका लागणार नाही आणि तुमच्या पैशांची बचत होईल.
ही गोष्ट ठेवा लक्षात
टोल नाका वाचविण्यासाठी, तुमचे दुरचे इच्छित स्थळ गाठण्यासाठी तुम्हाला सहाजिकच अधिकचा प्रवास करावा लागू शकतो. कारण टोल नाका असलेल्या एक्सप्रेस वे, हायवे तुम्हाला झटपट तुमच्या इच्छितस्थळी पोहचवू शकतील. तर विना टोल नाके असलेल्या रस्त्यांवरील प्रवास अधिक जिकरीचा, दूरचा ठरु शकतो. त्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.