ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूक तुमच्या स्मार्टफोनमध्ये घेण्यासाठी काय कराल?
नवी दिल्ली : वाहन चालक प्रवासादरम्यान नेहमीच आपल्या वाहनाची कायदेशीर कागदपत्रे विसरतात. त्यामुळे वाहतूक पोलीस तपासणी करताना ड्रायव्हिंग लायसन्स सादर न करु शकल्याने दंडही आकारतात. वाहनाशी संबंधित कागदपत्रे सोबत बाळगणे अनेकदा जोखमीचेही असते. यावर उपाय म्हणून सरकारने ‘mParivahan’ हे अधिकृत अॅप तयार केले आहे. ‘mParivahan’ या अॅपच्या मदतीने वाहनचालक आपले नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आणि ड्रायव्हिंग […]
नवी दिल्ली : वाहन चालक प्रवासादरम्यान नेहमीच आपल्या वाहनाची कायदेशीर कागदपत्रे विसरतात. त्यामुळे वाहतूक पोलीस तपासणी करताना ड्रायव्हिंग लायसन्स सादर न करु शकल्याने दंडही आकारतात. वाहनाशी संबंधित कागदपत्रे सोबत बाळगणे अनेकदा जोखमीचेही असते. यावर उपाय म्हणून सरकारने ‘mParivahan’ हे अधिकृत अॅप तयार केले आहे.
‘mParivahan’ या अॅपच्या मदतीने वाहनचालक आपले नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आणि ड्रायव्हिंग लायसन्ससारखी कागदपत्रे स्मार्टफोनमध्ये डिजिटल स्वरुपात ठेऊ शकतात. हे अॅप अँड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) दोन्ही ऑपरेटींग सिस्टमसाठी उपलब्ध आहे. प्ले स्टोअरवरुन हे अॅप डाउनलोड करता येईल. त्यानंतर अॅपमध्ये नोंदणी करणेही आवश्यक आहे.
अॅपची वैशिष्ट्ये
‘mParivahan’ या अॅपवरील डिजीटल कागदपत्रेदेखील मुळ कागदपत्रांप्रमाणेच वैध मानली जातील. त्यांची स्वतंत्रपणे वैधताही तपासता येईल. वाहतूक पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केल्यास तुम्ही त्यांना स्मार्टफोनवरील वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) दाखवू शकता. या अॅपच्या मदतीने डिजीटल लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी गाडीचा नोंदणी क्रमांक आणि मुळ ड्रायव्हिंग लायसन्स होणे आवश्यक आहे. तसेच जन्म दिनांकही सांगावा लागेल.
‘mParivahan’ अॅपवर डिजीटल आरसी डाऊनलोडची प्रक्रिया
- ‘mParivahaan’ अॅप उघडा.
- टॉप राईट कॉर्नरवर क्लिक करा.
- तेथे Sign in ऑप्शनवर क्लिक करा आणि आपला मोबाईल क्रमांक टाका.
- मोबाईलवर एसएमएसने आलेला व्हेरिफिकेशन कोड टाका.
- आता अॅपच्या होमस्क्रीनवर जाऊन RC वर क्लिक करा.
- सर्च टॅबमध्ये गाडीचा नोंदणी क्रमांक टाका आणि सर्च करा.
- अॅप रजिस्ट्रेशन क्रमांकाशी जोडलेली माहिती ऑटोमॅटीकली दिसेल.
- ‘Add to dashboard’ वर क्लिक करा आणि RC समाविष्ट करा.