नवी दिल्ली : भारत-चीन सीमारेषा भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळत (Tik Tok Ban In India) आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यात टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अॅप्लिकेशनचा समावेश आहे. नुकतंच याबाबतचं पत्रक जाहीर करण्यात आलं आहे. (Chinese Apps Ban In India)
भारतीय सार्वभौमत्व, संरक्षणाबद्दल, एकात्मतेबद्दल पूर्वग्रह दूषित असल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने याबाबतचे कठोर पाऊल उचलले आहे. डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, TikTok, Shareit, UC Browser, Helo, Mi Community, YouCam makeup, Clash of Kings या अॅपचा या यादीत समावेश आहे.
टिक-टॉकवरही बंदी
‘टिक टॉक’ हे चीनमध्ये तयार करण्यात आलेले अॅप (Tik Tok Ban In India) आहे. चीनमध्ये हे अॅप ‘डॉयइन’ नावाने प्रसिद्ध आहे. सप्टेंबर 2016 साली चीनने ‘डॉयइन’ या अॅपला चीनच्या ऑनलाईन मार्केटमध्ये लाँच केलं होत. त्यानंतर वर्षभरात ‘टिक टॉक’ या नावाने हे अॅप जगभरात लाँच झाले. 73 एमबीचे हे अॅप असून याचे 500 मिलियन अर्थात 50 कोटीपेक्षा जास्त युजर्स आहेत.
हेही वाचा – जगभरात सर्वाधिक डाऊनलोडिंग, व्हॉट्सअॅपलाही मागे टाकत टिक टॉक नंबर वन
भारताकडून चीनच्या ‘या’ अॅपवर बंदी
(Chinese Apps Ban In India)
Government of India bans 59 mobile apps. Tik Tok, UC Browser and other Chinese apps included in the list. pic.twitter.com/RZyZ9FsAsc
— ANI (@ANI) June 29, 2020
संबंधित बातम्या :
चीनला 1126 कोटींचा झटका देण्याची भारताची तयारी, RRTS प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता
चीनने भारतीय वाघांना डिवचलं, भारत-चीन वादावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिक्रिया