Googleचे नवे फिचर, आता स्मार्टफोनच्या कॅमेराने ‘हार्ट रेट’ तपासता येणार!

कंपनीने आता पिक्सेल स्मार्टफोनच्या Google फिट अ‍ॅपमध्ये नवीन हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी मॉनिटरची घोषणा केली आहे.

Googleचे नवे फिचर, आता स्मार्टफोनच्या कॅमेराने ‘हार्ट रेट’ तपासता येणार!
Googleचे नवे फिचर, आता स्मार्टफोनच्या कॅमेराने ‘हार्ट रेट’ तपासता येणार!
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 3:29 PM

मुंबई : गुगल आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी अर्थात युझर एक्सपीरियंस अपडेट करण्यासाठी नेहमीच नवीन वैशिष्ट्ये आणत असतो. याचप्रमाणे, कंपनीने आता पिक्सेल स्मार्टफोनच्या Google फिट अ‍ॅपमध्ये नवीन हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी मॉनिटरची घोषणा केली आहे. या महिन्याच्या अखेरीस हे वैशिष्ट्य सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. तथापि, कंपनीने सध्या या फिचरच्या रोलआऊटच्या तारखेविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही (Heart Rate and Respiratory monitor new features in Google Pixel).

अश्याप्रकारे ट्रॅक करणार हार्ट आणि रेस्पिरेटरी रेट

विशेष म्हणजे Google पिक्सेल डिव्हाईससाठी येणारी ही दोन्ही नवी वैशिष्ट्ये स्मार्टफोन कॅमेराच्या मदतीने काम करतील. वापरकर्त्याच्या हृदय गतीचे परीक्षण करण्यासाठी, ते बोटाच्या बोटांमधून जात असलेल्या रक्ताच्या रंगात होणारे बदल ट्रॅक करेल. दुसरीकडे, रेस्पिरेटरी मॉनिटर वापरकर्त्याच्या छातीच्या ‘राईज अँड फॉल’ प्रकिया ट्रॅक करेल.

कंपनीच्या एका आरोग्य उत्पादनाच्या व्यवस्थापकाने (Health Product Manager) सांगितले की, श्वासोच्छवासाच्या वेळी डॉक्टर रुग्णाच्या छाती वर खाली होण्याच्या प्रक्रियेतून रुग्णाच्या श्वसनाचा दरही शोधून काढतात. Google चे हे रेस्पिरेटरी मॉनिटर देखील समान पद्धतीणे काम करेल (Heart Rate and Respiratory monitor new features in Google Pixel).

वैद्यकीय स्थितीचा अंदाज घेता येणार नाही!

कंपनीने म्हटले आहे की, या फीचर्सच्या मदतीने युजर्स त्यांच्या संपूर्ण आरोग्याच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात. या बरोबरच कंपनीने असेही म्हटले आहे की, हे दोन मॉनिटर्स वैद्यकीय स्थितीचे आकलन करू शकत नाहीत.

Google पिक्सेल फोनमध्ये असणारा हार्ट रेट मॉनिटर Samsung च्या Galaxy S10 सारख्या काही डिव्हाईसमध्ये असणाऱ्या या मॉनिटरप्रमाणेच कार्य करतो. तथापि, सॅमसंगने गॅलेक्सी एस 10 ई, गॅलेक्सी एस 20 सीरीज आणि त्यानंतर लॉन्च केलेल्या स्मार्टफोनमधून हे वैशिष्ट्य काढून टाकले आहे.

गूगल पिक्सेलची वैशिष्ट्य :

परफॉर्मंस – स्नॅपड्रॅगन 821

स्टोरेज – 32 जीबी

कॅमेरा – 12.3 मेगापिक्सल

बॅटरी – 2770 एमएएच

डिस्प्ले – 5.0″(12.7 सेमी)

रॅम – 4 जीबी

(Heart Rate and Respiratory monitor new features in Google Pixel)

हेही वाचा :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.