मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसतानाही आधार कसं डाऊनलोड कराल?
तुम्ही आता तुमचे नातेवाईक किंवा मित्र त्यांच्यासाठीही तुम्ही आधार रीप्रिंट सर्व्हिस करु शकता. यानंतर त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर आधार कार्ड पाठवले जाईल.
मुंबई : आतापर्यंत आधार कार्डला रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपीच्या मदतीने प्रिंट केले जात होते. पण आता तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरशिवायही आधार कार्ड प्रिंट करता येणार आहे. नुकतंच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण संस्था म्हणजेच UIDAI ने नागरिकांना ‘ऑर्डर आधार रीप्रिंट’ सर्व्हिसची माहिती दिलेली आहे. तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डसोबत जोडलेला असो किंवा नंबर बदलेला असो, तरीही तुम्ही पुन्हा आधार कार्ड प्रिंट करु शकता.
याशिवाय तुम्ही आता तुमचे नातेवाईक किंवा मित्र त्यांच्यासाठीही तुम्ही आधार रीप्रिंट सर्व्हिस करु शकता. यानंतर त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर आधार कार्ड पाठवले जाईल.
पाहा पूर्ण प्रक्रिया
- सर्वात पहिले www.uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in च्या वेबसाईट वर जा.
- या ठिकाणी Order Aadhaar Reprint ऑप्शनवर क्लिक करा
- यानंतर तुमचा 12 चा आधार कार्ड नंबर किंवा 16 डिजीटचा व्हर्चुअल आयडेंटिफिकेशन नंबर टाका
- यानंतर सिक्युरिटी कोड भरा.
- जर तुमच्याकडे रजिस्टर नंबर नसेल, तर त्या ठिकाणी दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि येथे कोणता दुसरा नंबर असेल तो टाका.
- यानंतर आता Send OTP वर क्लिक करा आणि तुमच्या मोबाइलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन प्रोसेस करा.
- तुम्हाला वाटत असेल, तर आधार कार्डचे एकदा फायनल प्रिव्ह्यूही पाहू शकता.
- प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करुन आधार रीप्रिंटचे शुल्क भरा.
- पेमेंट केल्यानंतर रिसीट जनरेट होईल, त्यामुळे तुम्ही पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करु शकता. त्यासोबतच तुम्हाला SMS च्या माध्यमातून सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (SRN) मिळेल.
- यानंतर 10 ते 15 दिवसानंतर तुम्हाला तुमचे आधारकार्ड मिळेल, तुम्ही तुमच्या आधार कार्डची डिलीव्हरीही ट्रॅक करु शकता.