ISRO ने रचला इतिहास; अंतराळात शानदार शतक, NVS-02 नॅव्हिगेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण
ISRO navigation satellite : इस्त्रोने अंतराळात इतिहास रचला आहे. NVS-02 चे 100 वे मिशन यशस्वी झाले. इस्त्रोने ट्वीट करत GSLV-F15/NVS-02 मोहिम फत्ते झाल्याची माहिती दिली. या मोहिमेमुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवल्या गेलाय.

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने (ISRO) सकाळीच भारतीयांना आनंदाची बातमी दिली. सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून NVS-02 घेऊन जाणाऱ्या GSLV-F15 चे यशस्वी उड्डाण केले. देशातील अंतराळ केंद्रातून इस्त्रोने 100 वे प्रक्षेपण केले. इस्त्रोने ट्वीट करत GSLV-F15/NVS-02 मोहिम फत्ते झाल्याची माहिती दिली. या मोहिमेमुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवल्या गेलाय. इस्त्रोचे नवीन अध्यक्ष व्ही नारायण यांच्या नेतृत्वात हे मशीन राबवण्यात आले. त्यांनी 13 जानेवारी रोजी पदभार संभाळाला होता.
GSLV-F15 चा फायदा काय?
इस्त्रोने ही अंतराळ मोहीम हाती का घेतली याविषयी जनतेत उत्सुकता आहे. GSLV-F15 हा भारतीय उपखंडातील आणि देशाच्या भूभागातील 1,500 किलोमीटर पट्ट्यातील वापरकर्त्यांना अचूक स्थिती, वेग आणि वेळेची महिती मिळेल. सोमवारी रात्री 2:53 वाजता या मोहिमेची गणिती सुरू झाली होती. सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.




इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव
इस्त्रोने मोहिम फत्ते केल्यावर अंतराळ संशोधन संस्थेवर कौतुकाचा वर्षाव झाला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोचे अभिनंदन केले. श्रीहरिकोटा येथून 100 वे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल त्यांनी इस्त्रोचे कौतुक केले. टीम ISRO, तुम्ही पुन्हा एकदा GSLV-F15 / NVS-02 मोहिम फत्ते करून देशाचा गौरव केल्याचे सिंह म्हणाले.
जीएसएलवी-एफ15 भारताच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (जीएसएलवी) चे हे 17 वे उड्डाण होते. इंडिजिनियस क्रायो स्टेजसह हे 11 वे उड्डाण होते. तर इंडिजिनियस क्रायोजेनिक स्टेजसह जीएसएलवीचे हे 8 वे ऑपरेशनल फ्लाईट होते. जीएसएलवी-एफ15 पेलोड फेअरिंग एक मेटेलिक व्हर्जन आहे.
विद्यार्थ्यांनी अनुभवले सॅटेलाईट प्रक्षेपण
इंडिजिनियस क्रायोजेनिक स्टेजचे जीएसएलवी-एफ15 एनवीएस-02 हा सॅटेलाइट, जियोसिंक्रोनस ट्रांसफर ऑर्बिट, त्या कक्षेत स्थापित करण्यात आल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. विशेष अनेक विद्यार्थ्यांना लाँचपॅडजवळ सॅटेलाईट प्रक्षेपण अनुभवायला मिळाले. इतक्या जवळून सॅटेलाईटचे प्रक्षेपण पाहायला मिळाल्याने भविष्यातील वैज्ञानिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. विद्यार्थ्यांनी त्यांचा आनंद यावेळी टाळ्या वाजवून व्यक्त केला.