Sunder Pichai यांच्या दिवसाची अशी होते सुरुवात, ही वेबसाईट त्यांच्यासाठी आहे खास

Sunder Pichai | गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची सुरुवात ही काही सोशल मीडिया पाहून होत नाही. ते सकाळी वृत्तपत्र वा सोशल मीडिया वाचत नाहीत तर सकाळची सुरुवात एका खास वेबसाईटने होते. ही एक टेक वेबसाईट आहे. ही वेबसाईट मेटाचे सीईओ मार्क झुगरबर्ग पण पाहतात, जाणून घ्या याविषयी...

Sunder Pichai यांच्या दिवसाची अशी होते सुरुवात, ही वेबसाईट त्यांच्यासाठी आहे खास
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 2:23 PM

नवी दिल्ली | 11 February 2024 : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना कोण ओळखत नाही? अनेकांना ही श्रीमंत आणि बड्या कंपनीची उच्च पदस्थ मंडळी दिवसाची सुरुवात कशी करत असतील, त्यांचा काय खास प्लॅन असतो का, असा प्रश्न पडतो. तुम्हाला वाटत असेल सुंदर पिचाई सकाळी उठून अगोदर वृत्तपत्र वाचतात अथवा मोबाईल उघडून लगेच फेसबुक, व्हॉट्सअप अथवा इतर कोणते सोशल प्लॅटफॉर्म चळत असतील तर ते साफ चूक आहे. कारण सुंदर पिचाई उठल्यानंतर सर्वात आधी Techmeme ही वेबसाईट पाहतात. केवळ तेच नाही तर तंत्रज्ञान जगतातील अनेक दिग्गज ही वेबसाईट फॉलो करतात. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती समोर आली आहे.

अनेक दिग्गजांची पहिली पसंत

Techmeme हे एक तंत्रज्ञानाचे संकेतस्थळ आहे. जगभरातील टेक वेबसाईटचे मथळे तुम्हाला या एकाच प्लॅटफॉर्मवर दिसतात. यामध्ये Bloomberg, CNBC आणि The Verge यांचा समावेश आहे. या वेबसाईटमुळे जगभरातील तंत्रज्ञानाची अपडेट झटपट समोर येते. ही वेबसाईट केवळ सुंदर पिचाईच पाहतात, असे नाही. तर मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग, सीटीओ अँड्रू बोसवर्थ आणि इस्टाग्रामचे हेड अदम मोसुरी यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

Tim Cook यांच्या दिवसाची अशी होते सुरुवात

Apple चे सीईओ टीम कूक यांची सुरुवात पण सामान्य नाही. ते सर्वात अगोदर ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे पाहण्यासाठी ई-मेल तपासतात. त्यावरील प्रतिक्रिया काय आल्यात ते नोंदवतात. त्यानंतर वर्कआऊट करतात. Spotify CEO Daniel Ek हे दिवसाची सुरुात बातमी अथवा पुस्तक वाचनाने करतात.

पुन्हा कपातीचे धोरण

गुगलचे सीईो सुंदर पिचाई यांनी पुन्हा नोकर कपातीचे संकेत दिले आहेत. या वर्षी सुद्धा गुगल कर्मचारी कपात करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. हार्डवेअर, सेल्स, सिक्युरिटी, इंजिनिअरिंग आणि युट्यूबवरील कर्मचाऱ्यांना कदाचित नारळ मिळू शकतो. या कर्मचारी कपातीचा परिणाम कंपनीवर पण दिसून येईल. यापूर्वी पण कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.