Google युझर्सकडून घेत नाही छदाम, तरीही कशी होते मिनिटाला 2 कोटींची कमाई

Google Income : गुगलच्या अनेक सेवा युझर्ससाठी एकदम मोफत आहेत. तरीही गुगल दर मिनिटाला 2 कोटी रुपये छापते. हे ऐकून अनेकांना धक्का बसतो. पण हे खरं आहे. अनेक सेवा मोफत दिल्यानंतर पण गुगल दर मिनिटाला अशी कोट्यवधींची कमाई करते.

Google युझर्सकडून घेत नाही छदाम, तरीही कशी होते मिनिटाला 2 कोटींची कमाई
गुगलची जोरदार कमाई
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 5:12 PM

गुगल हे सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे. कोणतीही माहिती जाणून घ्यायची असली की आपण गुगल करतो. गुगलवर तुम्ही काही पण सर्च करु शकता. त्यासाठी गुगल तुमच्याकडून एक नवा पैसा घेत नाही. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. त्यासाठी सब्सक्रिप्शन नाही. तुम्ही कोणत्याही वेळी यावर तुमची माहिती हुडकू शकता. पण अनेकांना माहिती नाही की, गुगल दर मिनिटाला दोन कोटी रुपयांची कमाई करते. अनेकांसाठी हा आश्चर्याचा धक्का आहे. गुगल मिनिटाला दोन कोटी रुपये कशी कमाई करत असेल, असा सवाल अनेकांना सतावतो.

प्रत्येक मिनिटाला 2 कोटींची कमाई कशी?

याविषयीच्या वृत्तानुसार, गुगल दर मिनिटाला 2 कोटी रुपये कमाई करते. मोफत सेवा देत असताना गुगल कमाई करते तरी कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गुगलच्या कमाईचे साधन तरी काय, असे अनेकांना वाटते. तर गुगलच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा जाहिरात आहे. जाहिरातीच्या माध्यमातून ही कंपनी मोठी कमाई करते.

हे सुद्धा वाचा

जाहिरातीतून कशी होते कमाई ?

जाहिरातीतून गुगलला कशी कमाई होते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर गुगलवर तुम्ही सर्च करताना एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की कोणता पण रिझल्ट येण्यापूर्वी, माहिती येण्यापूर्वी जाहिरात येते. जाहिरातीची लिंक, प्रमोशनची लिंक अगोदर दिसते. या जाहिरात देणाऱ्या कंपन्या गुगलला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देतात.

युट्यूबकडून कमाई

युट्यूबवर व्हिडिओ पाहताना आपल्याला मधून मधून जाहिरात पहावीच लागते. त्यातील काही जाहिराती तर आपल्याला स्किप सुद्धा करता येत नाहीत. त्यामाध्यमातून गुगलला जोरदार महसूल मिळतो. युट्यूबच्या काही सेवा या सशुल्क आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात. त्यामाध्यमातून गुगलची कमाई होते.

गुगल प्ले स्टोअर

गुगल क्लाउड आणि प्रिमियम कंटेट सारख्या सेवांचा फायदा घ्यायचा असेल तर गुगलला पैसे द्यावे लागतात. Android हे गुगलचे उत्पादन आहे. त्यासाठी कोणताही पैसा द्यावा लागत नाही. गुगल प्ले स्टोअर पण गुगलच्या कमाईचे एक माध्यम आहे. गुगल प्ले स्टोअर वापरासाठी युझर्सला पैसा द्यावा लागत नाही. पण ॲप डेव्हलपर्सला गुगल प्ले स्टोअरवर ॲप स्टोअर करण्यासाठी गुगलला पैसे द्यावे लागतात.

Non Stop LIVE Update
'भाजपवाल्यानो... आता पहिले तुमचीच मस्ती जिरवतो', जानकरांना संताप अनावर
'भाजपवाल्यानो... आता पहिले तुमचीच मस्ती जिरवतो', जानकरांना संताप अनावर.
भाजपच्या जाहीरनाम्यात 'लाडक्या बहिणीं'सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
भाजपच्या जाहीरनाम्यात 'लाडक्या बहिणीं'सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा.
'मविआ'चा महाराष्ट्रनामा, जाहीरनाम्यात 'या' पंचसूत्रीसह कोणत्या घोषणा
'मविआ'चा महाराष्ट्रनामा, जाहीरनाम्यात 'या' पंचसूत्रीसह कोणत्या घोषणा.
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी.
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल.
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा.
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?.
सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता.., फडणवीसांचा MIM ला इशारा
सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता.., फडणवीसांचा MIM ला इशारा.
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम.
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली.