किती कालावधीने करावे एसीचे फिल्टर स्वच्छ? या टिप्सने होऊ शकते मोठी बचत
सध्या उन्हाळ्याची स्थिती खूपच वाईट आहे. अनेकांना त्यांच्या एसीमुळे खोली नीट थंड होऊ शकत नसल्याची तक्रार येत आहेत. एसी चालू असतानाही गरम वाटतं.
मुंबई : उन्हाळा सुरू झाला आहे. सध्या उन्हाळ्याची स्थिती खूपच वाईट आहे. अनेकांना त्यांच्या एसीमुळे खोली नीट थंड होऊ शकत नसल्याची तक्रार येत आहेत. एसी चालू असतानाही गरम वाटतं. तुमच्या एसीसोबतही असे होत असेल तर एसीच्या एअर फिल्टरवर घाण साचली असण्याची शक्यता आहे. आज आपण एसी एअर फिल्टरच्या मेंटेनन्सबद्दल (Ac Cleaning Tips) जाणून घेणार आहोत. यासोबत आम्ही हेही सांगितले आहे की, तुम्ही एसीचे एअर फिल्टर किती दिवसांत स्वच्छ करावे.
साफसफाईची गरज का आहे?
जर तुम्ही अशा वातावरणात रहात असाल जिथे भरपूर धूळ किंवा प्रदूषण असेल तर एअर फिल्टरमध्ये घाण जमा होते. अशा ठिकाणी, फिल्टरमध्ये घाण आणि धुळ वेगाने जमा होण्याची शक्यता असते. तसेच, उष्ण आणि दमट हवामानात एसीच्या वाढत्या वापरामुळे एअर फिल्टरवर कण जलद जमा होऊ शकतात.
स्वच्छता किती दिवसात करावी?
स्वच्छता किती दिवसांत करावी, या प्रश्नाचे उत्तर अनेक घटकांवर अवलंबून आहे. तुमच्या एसीमध्ये कोणता फिल्टर बसवला आहे हे तुम्ही आधी तपासले पाहिजे? खरं तर, डिस्पोजेबल फिल्टर्स वारंवार बदलण्याची आवश्यकता असू शकते, तर पुन्हा वापरता येण्याजोग्या फिल्टरला नियमित साफसफाईची आवश्यकता असते.
जर तुम्हाला चांगली आणि स्वच्छ हवा हवी असेल तर तुम्ही 2 आठवड्यात एसी एअर फिल्टर साफ करू शकता. तथापि, आपण महिन्यातून एकदा तरी एअर फिल्टर साफ करणे आवश्यक आहे. तुम्हाला हे देखील लक्षात घ्यावे लागेल की जर एअर फिल्टर एक महिन्यापूर्वी गलिच्छ दिसत असेल तर तुम्ही ते ताबडतोब साफ करावे. जर तुम्हाला साफसफाई कशी करावी हे माहित नसेल, तर तुम्ही साफसफाई करण्यासाठी संबंधीत सेवा देणाऱ्यांना संपर्क करू शकता.