नॅनोपेक्षाही छोटी कार लवरच बाजारात, किंमत किती?

मुंबई : बजाज कंपनीने नॅनोलाही टक्कर देण्यासाठी बजाज क्यूट Bajaj Qute कार लाँच केली आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मेड इन इंडियाची Bajaj Qute कार लवकरच भारतीय रस्त्यावर धावताना दिसणार आहे. सरकारकडूनही या चारचाकी (क्वाड्रिसायकल) प्रकारच्या कारला वैयक्तिक वापरासाठी परवानगी दिली आहे. Bajaj Qute ला 2012मध्ये परदेशात लाँच केलं होते. त्यावेळी हे मॉडेल RE60 या नावाने लाँच करण्यात आलं होते. Bajaj Qute कारमध्ये 216cc, सिंगल सिलेंडर, वॉटर कोल्ड पेट्रोल इंजिन […]

नॅनोपेक्षाही छोटी कार लवरच बाजारात, किंमत किती?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

मुंबई : बजाज कंपनीने नॅनोलाही टक्कर देण्यासाठी बजाज क्यूट Bajaj Qute कार लाँच केली आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मेड इन इंडियाची Bajaj Qute कार लवकरच भारतीय रस्त्यावर धावताना दिसणार आहे. सरकारकडूनही या चारचाकी (क्वाड्रिसायकल) प्रकारच्या कारला वैयक्तिक वापरासाठी परवानगी दिली आहे.

Bajaj Qute ला 2012मध्ये परदेशात लाँच केलं होते. त्यावेळी हे मॉडेल RE60 या नावाने लाँच करण्यात आलं होते. Bajaj Qute कारमध्ये 216cc, सिंगल सिलेंडर, वॉटर कोल्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. क्यूटच्या इंजिनला मोटरसायकलसारखे 5 गिअर आहेत. तसेच एलपीजी आणि सीएनजी गॅसचा पर्यायही दिला आहे. Bajaj Qute (क्वाड्रिसायकल) 70 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. या कारचं मायलेज 35 किलोमीटरचा इतकं आहे.

परिवहन मंत्रालयाच्या अंदाजे क्वाड्रिसायकल प्रकारची वाहने हायवेवर जास्तकाळ चालू शकत नाहीत. या कारचा टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रतितास आहे. पण चार लेनच्या हायवेवर 60 किलोमीटर प्रति तास वेगाने ही कार चालू शकत नाही. शहरात या गाडीचा स्पीड 50 किमी प्रति तास बंधनकारक ठेवण्यात आला आहे.

Bajaj Qute कारची लांबी 2752 mm, रुंदी 1312 mm आणि उंची 1652 mm आहे. टर्निंग रेडियस फक्त 3.5 मीटर दिला आहे. यामुळे ही कार गर्दीच्या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. कारमध्ये चार लोक बसण्याची आसन व्यवस्था आहे. या कारचं वजन 400 किलोग्राम आहे.

Bajaj Quteची किंमत 1.5 लाख ते 2 लाखाच्या घरात असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.