10 लाख व्ह्यूजवर अशी होते कमाई; Youtube करते इतकी रक्कम खात्यात जमा

Youtuber Income | आता ग्रामीण भागात पण यशस्वी युट्यूबर्स आहेत. अनेक जणांना या माध्यमातून चांगली कमाई होते. या प्लॅटफॉर्मवर अनेक जण व्हिडिओ तयार करुन अपलोड करतात. त्याला मिळणाऱ्या व्ह्यूजआधारे युट्यूब पेमेंट करते. 10 लाख व्ह्यूजवर किती कमाई होते, हे तुम्हाला माहिती आहे का?

10 लाख व्ह्यूजवर अशी होते कमाई; Youtube करते इतकी रक्कम खात्यात जमा
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 10:17 AM

नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : सध्याच्या काळात अनेक जण ऑफलाईन सोबतच ऑनलाईन पण चांगली कमाई करत आहेत. ऑनलाईन कमाईत अनेकांचा ओढा युट्यूबकडेच असतो. सध्याच्या काळात असे अनेक युट्यूबर्स आहेत, जे जोरदार कमाई करत आहेत. त्यांच्या कमाईच्या आकड्यांनी डोळे पांढरे होतात. ग्रामीण भागातही अनेक जण या माध्यमातून पैसा कमावत आहेत. पण अनेकांना अजूनही व्ह्यूजचे गणित उमगेलेले नाही. दहा लाख व्ह्यूज झाल्यावर युट्यूब किती रुपये खात्यात जमा करते हे त्यांना माहिती नाही. तुमच्या मनात घोळणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर शोधुयात..

मॉनिटायझेशनचा निकष काय

सर्वात पहिल्यांदा मनात प्रश्न येतो की, युट्यूब कोणत्या आधारे युट्यूबर्सला रक्कम मोजते. म्हणजे त्याचे निकष तरी काय? तर युट्यूब एडसेन्सच्या माध्यमातून पेमेंट करते. जे कंटेंट क्रिएटर्स युट्यूबचा मॉनिटायझेशन क्रायटेरिया, निकष देण्यात आले आहे. त्यासाठी कंटेंट क्रिएटर्सला एडसेन्सचे खाते उघडावे लागते.

हे सुद्धा वाचा
  • युट्यूब चॅनल मॉनिटायझेशनसाठी 1000 Subscribers आवश्यक आहे
  • चॅनलवर 4000 तासांचा वॉचटाईम आवश्यक आहे
  • चॅनलवर अपलोड केलेल्या शॉर्ट व्हिडिओवर गेल्या 90 दिवसांत एक कोटी व्ह्यूज असायला हवेत

कसे करते पेमेंट Youtube

Youtube क्रिएटर्सला वेगवेगळ्या श्रेणीत विभागून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करते. एक मिलियन म्हणजे दहा लाख व्यूज क्रिएटरला देण्यात येणारे पेमेंट सर्वाधिक असते. सर्वसाधारणपणे युट्यूब दहा लाख व्ह्यूजवर 100 डॉलर वा त्यापेक्षा अधिकचे पेमेंट करण्यात येते.

  • Cost per Click-CPM आणि Click Through Rate-CTR या नुसार पेमेंट ठरते
  • जो व्हिडिओ लोक पाहत आहे, त्यावर किती लोकांनी क्लिक केले. त्याला सीटीआर म्हणतात. म्हणजे या व्हिडिओवर क्लिक थ्रू रेट 2 टक्के असेल तर 100 लोकांमधील 2 जणांनी जाहिरातीवर क्लिक केले असा त्याचा अर्थ निघतो
  • ज्या व्हिडिओवर जितका जास्त क्लिक थ्रू रेट असेल, तितके अधिक पेमेंट मिळते
  • युट्यूब टेक्नॉलॉजी, बिझनेस आणि फायनान्स या विषयाशी संबंधित चॅनलला आरपीएम मिळत असल्याचे समोर आले आहे.
  • युट्यूबने दहा लाख व्ह्यूजवर किती रक्कम देण्यात येते हे काही अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.