रंगीत व्होटर आयडी हवंय? मग ऑनलाईन अप्लाय करा! जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला त्याबाबतची माहिती देत आहोत.

रंगीत व्होटर आयडी हवंय? मग ऑनलाईन अप्लाय करा! जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 9:22 AM

मुंबई : आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे.

तुम्हालाही जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला त्याबाबतची माहिती देत आहोत.

1. रंगीत मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या घराच्या पत्त्यासंबंधीचा पुरावा (address proof), वय व जन्मतारखेसंबंधित पुरावा आणि तुमचा एक फोटो सोबत ठेवा.

2. नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल (NVSP) च्या वेबसाईटवर जा

3. होमपेजवर व्होटर पोर्टल बॉक्सवर क्लिक करा. आता तुम्हाला https://voterportal.eci.gov.in पोर्टल दिसेल.

4. या पेजवर स्वतःचं रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी तुम्हाला नवीन अकाऊट बनवावं लागेल. इथे तुम्ही गुगल, फेसबुक किंवा कोणत्याही इतर अकाउंटचा वापर करु शकता.

5. रजिस्ट्रेशननंतरच्या पेजवरील फॉर्म 6 भरा. इथे तुम्हाला तुमचा फोटो आणि इतर माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती भरुन झाल्यानंतर एकदा फॉर्म तपासा आणि खाली दिलेल्या सबमिट बटणवर क्लिक करा. त्यानंतर काही दिवसांनी तुमचं रंगीत मतदार ओळखपत्र तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल.

तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नाही, मग हे करा…

मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. तसेच मतदान यादीत नाव असेल आणि मतदार ओळखपत्र नसेल तर निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ओळखपत्रांच्या आधारे मतदानाचा हक्क बजावता येतो.

संबंधित बातम्या

मतदानाला जाताना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नाही? ‘हे’ आहेत पर्याय

मतदान ओळखपत्रंही आधार कार्डला लिंक होणार?

(How to Apply for Colour Voter ID card online)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.