तुमचा पासवर्ड कुणी हॅक केलाय का? इथे चेक करा?
मागील काळात ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरणे घडल्याने नागरिकही काळजीत आहेत. त्यात सायबर गुन्ह्यांच्या तपासात आपली तपास यंत्रणाही कमी पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काही दक्षता घेण्याची गरज आहे.
मुंबई: नव्या तंत्रज्ञानाने आपल्या दैनंदिन व्यवहारात जसा सोपेपणा आणला आहे, तसाच काही धोकाही वाढवला आहे. मात्र, हा धोका योग्य ती काळजी घेतल्यास टाळताही येतो आणि आपल्याला तंत्रानाचा भरपूर उपयोग घेता येतो. मागील काळात ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरणे घडल्याने नागरिकही काळजीत आहेत. त्यात सायबर गुन्ह्यांच्या तपासात आपली तपास यंत्रणाही कमी पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काही दक्षता घेण्याची गरज आहे.
नागरिकांची व्यक्तिगत माहिती चोरुन अनेक गुन्हे घडल्याची नोंद आहे. त्यामुळे आपली माहिती चोरली गेली आहे की नाही हे तपासणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, हे तपासायचे कसे याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. यासाठी काही सर्विस कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. गुगलनेही एक टूल लाँच केलं आहे. त्याचा उपयोग करुन युजर्सला आपली माहिती सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा करता येते.
या सुविधेचा उपयोग करण्यासाठी गुगल क्रोमचे अपडेटेड व्हर्जन असणे आवश्यक आहे. तसेच इंटरनेटची सुविधाही गरजेची आहे. हे असेल तर आपण गुगलचे ‘पासवर्ड चेकअप’ टुल डाऊनलोड करु शकतो. त्यासाठी खालील टप्प्यांचा उपयोग होतो.
- आपल्या कंम्प्युटरवर गुगल क्रोम सुरु करा.
- त्यानंतर गुगल क्रोम स्टोअर उघडा, त्यात पासवर्ड चेकअप शोधा.
- हे टुल इन्स्टॉल करण्यासाठी ‘Add to Chrome’ या पर्यायावर क्लिक करा.
पासवर्ड चेकअप कसे काम करते?
हे टुल स्वयंचलित असून ते आपल्या पासवर्डवर आणि वेगवेगळ्या अकाऊंट्सच्या अॅक्टिव्हिटीवर देखरेख ठेवते. जर यातील काही एक्स्टेंशनमध्ये सुरक्षा संबंधित त्रुटी आढळल्या तर हे टुल कम्प्युटरवर एक सावधानतेचा संदेश देते. तसेच आपला पासवर्ड बदलण्याची सुचना करते. जर आपले याकडे लक्ष गेले नाही, तर कम्प्युटरवर इशारा देणारा पॉपअप बॉक्स तसाच लाल रंगात आपले लक्ष वेधून घेतो.
पासवर्ड चेकअप टुलचा उपयोग करुन पासवर्ड कसा बदलाल?
सर्वांना आपल्या एखाद्या खात्याचा अथवा सेवेचा पासवर्ड कसा बदलायचा हे माहिती असते. मात्र, आता पासवर्ड चेकअप टुल देखील युजर्सला सुरक्षित पासवर्ड कसा निवडायचा आणि तो कसा बदलायचा याविषयी मदत करते.