मुंबई : डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत सध्या निवडणूक आयोगकडून मतदार ओळखपत्र डिजिटल करण्याचे काम सुरू आहे. मतदार ओळखपत्र डिजिटल झाल्यानंतर आपण ते आपल्या मोबाईलवर सहजपणे डाउनलोड करू शकतो. मतदार कार्ड डिजिटल झाल्यानंतर, त्यावर आपले रंगीत छायाचित्र देखील दिसणार आहे. त्याचबरोबर मतदार ओळखपत्र डिजिटल झाल्यानंतर त्याची हार्ड कॉपी जवळ बाळगून फिरण्याची आवश्यकता भासणार नाही नाही (How to check your name in voter list by these easy step).
परंतु, ‘डिजिटल मतदान कार्ड’ डाऊनलोड करण्यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये जोडले जाणे आवश्यक आहे. यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव तपासणे देखील गरजेचे आहे. आपण ते ऑनलाईन तपासू शकतो. चला तर, आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की, नाही हे कसे तपासावे ते जाणून घेऊया.
मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे (https://Electoralsearch.in). त्यानंतर मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी स्वतःचे व वडिलांचे नाव टाकून आपले नाव तपासू शकता. दुसर्या टॅबमध्ये आपण आपले नाव एपिकच्या (मतदार ओळखपत्र) संख्येनुसार पाहू शकता. आपण आपल्या व्होटर अर्थात मतदान कार्डमध्ये नवीन माहिती अद्यतनित केली असेल तरच दुसरा टॅब वापरा. त्यानुसार आपल्याकडे एपिक नंबर नसल्यास ‘तपशीलांनुसार शोध घ्या’ वर क्लिक करा (How to check your name in voter list by these easy step).
समोर उघडलेल्या टॅबमध्ये प्रथम आपले पूर्ण नाव लिहा. त्यानंतर पुढे आपल्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाईप करा आणि आपले लिंग निवडा. यानंतर आपल्या जन्म तारखेपासून जिल्हा आणि विधानसभा माहिती भरा. यानंतर खाली दिलेल्या बॉक्समध्ये असलेला 5 अंकी कोड अचूक रिकाम्या रकान्यात लिहा. मग, शोध किंवा सर्च या बटणावर क्लिक करा. यानंतर पर्याय आल्यावर आपल्या नावावर क्लिक करा. यानंतर आपल्या नावासमोरील तपशीलावर क्लिक करून आपली माहिती तपासा. संपूर्ण तपशील भरल्यानंतरही मतदार यादीत आपली माहिती दिसत नसेल तर, आपण निवडणूक आयोगाशी टोल फ्री क्रमांक 1800111950 किंवा 1950 वर संपर्क साधू शकता.
(How to check your name in voter list by these easy step)
Aadhaar Card | ‘आधार’शी नेमका कोणता मोबाईल क्रमांक जोडलाय? केवळ 5 मिनिटांत मिळेल उत्तर!https://t.co/I9w0NH46fG#aadhaarcard #MobileNumber #Update
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020