Laptop Tips : लॅपटॉप स्वच्छ करताना या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होवू शकते मोठे नुकसान
Laptop Cleaning नवीन लॅपटॉप जितके प्रगत आहेत तितके ते अधिक नाजूक देखील आहेत. विशेषतः त्यांची स्क्रीन अतिशय संवेदनशील आहे. थोडासा दबाव किंवा रसायनांचा वापर स्क्रीन खराब करू शकतो.

लॅपटॉपImage Credit source: Social Media
मुंबई : आजकाल लॅपटॉप हे काम सर्वांसाठीच जवळजवळ आवश्यक असणारे गॅझेट बनले आहे. कार्यालयापासून घरापर्यंत याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. विद्यार्थी असो किंवा व्यावसायीक प्रत्त्येकच जण लॅपटॉपचा वापर करतात. नवीन लॅपटॉप जितके प्रगत आहेत तितके ते अधिक नाजूक देखील आहेत. विशेषतः त्यांची स्क्रीन अतिशय संवेदनशील आहे. थोडासा दबाव किंवा रसायनांचा वापर स्क्रीन खराब करू शकतो. अशा परिस्थितीत स्क्रीन साफ करताना काही खबरदारी न घेतल्यास हजारोंचे नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला लॅपटॉप साफ (How to clean Laptop) करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवशअयक आहे त्याबद्दल सांगणार आहोत.
लॅपटॉप खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी
- बरेच तज्ञ लॅपटॉप स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी केमीकल न वापरण्याची शिफारस करतात. असे केल्याने तुमच्या डिव्हाइसची स्क्रीन तसेच हार्डवेअर खराब होऊ शकते.
- स्क्रीनवर साचलेली धूळ काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे स्प्रे वापरू नका. यामुळे लॅपटॉपचे हार्डवेअर खराब होऊ शकते.
- स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोल किंवा कोणतेही रसायन वापरू नका. आजकाल सर्व टीव्ही आणि लॅपटॉपमध्ये एलसीडी स्क्रीनचा वापर केला जातो. रसायने त्याचे नुकसान करू शकतात.
स्वच्छ कसे करावे?
- लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी कोरडे सुती कापड किंवा मायक्रोफायबर कापड वापरा.
- लक्षात ठेवा की कापड स्वच्छ असावे, जेणेकरून त्यात असलेल्या धुळीच्या कणांमुळे पडद्यावर ओरखडे पडणार नाहीत.
- स्क्रीन साफ करताना हलक्या हातांनी स्वच्छ करा, जेणेकरून स्क्रॅच होणार नाही आणि दाब पडल्याने स्क्रीन खराब होणार नाही.
- पडद्यावर डाग असल्यास प्रथम कोरड्या कापडाने पडदा स्वच्छ करा. मग तुम्ही कापड किंचित ओले करून स्क्रीन पुसू शकता. पण पाणी आत जाऊ नये याची काळजी घ्यावी.
- स्क्रीन अजूनही स्वच्छ न आल्यास, मायक्रोफायबर कापडावर थोडेसे सॅनिटायझर लावा आणि हलक्या हाताने ते पूसा.
- जर एलसीडी स्क्रीन असेल तर कोणत्याही प्रकारचे केमिकल अजिबात वापरू नका.
- स्क्रीन साफ करताना हाताला वर्तुळाकार हालचाली करा. विशेषतः कोपरे साफ करताना कापड कोरडे ठेवा.