PhonePe आणि Google Pay खाते सहज तयार करायचं… पण कसं? जाणून घ्या….
सध्या भारतात डिजिटल पेमेंटच युग आहे, पण तुम्ही अजूनही PhonePe किंवा Google Pay वापरत नाही? UPI पेमेंट इतकं सोपं असू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? फक्त एक अॅप डाउनलोड करा, आणि सुरू होते एक सोपी पण महत्त्वाची प्रक्रिया. तुमचा मोबाइल नंबर – जो बँकेशी लिंक आहे – टाका, OTP टाका आणि अॅपला आवश्यक परवानग्या द्या. मग काय? अॅप तुमचं बँक खाते ओळखेल आणि डेबिट कार्डच्या काही माहितीसह तुम्ही UPI पिन सेट करू शकता.

सध्याच्या काळात भारतामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे. चहाच्या टपरीपासून ते मोठमोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत सर्वत्र UPI पेमेंटसाठी QR कोड लावलेले दिसतात. त्यामुळे PhonePe आणि Google Pay सारख्या अॅप्सद्वारे ऑनलाइन पेमेंट करणे आवश्यक बनले आहे. या लेखात आपण PhonePe आणि Google Pay मध्ये खाते कसे जोडायचे आणि UPI आयडी कसा तयार करायचा हे पाहणार आहोत.
स्टेप-१
PhonePe आणि Google Pay वर खाते आणि UPI आयडी तयार करण्याची प्रक्रिया साधारणपणे एकसारखीच असते. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store किंवा Apple App Store वर जाऊन PhonePe किंवा Google Pay हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. म्हणजेच, जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर Google Play Store वापरावा, आणि जर आयफोन युजर असाल तर Apple App Store चा उपयोग करावा.
स्टेप-२
अॅप डाउनलोड आणि इंस्टॉल केल्यावर, ते उघडा आणि आपला मोबाइल नंबर टाका. लक्षात ठेवा की तुम्ही जो नंबर टाकता तोच नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असावा, कारण PhonePe किंवा Google Pay हे अॅप्स त्या नंबरचा वापर करून तुमचे खाते व्हेरिफाय करतात.
स्टेप-३
तुमचा मोबाइल नंबर टाकल्यानंतर, तुम्हाला SMS द्वारे एक OTP (वन टाइम पासवर्ड) मिळेल. तुमचा मोबाइल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी तो OTP टाका आणि पुढे जा. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर अॅपमध्ये तुमची पसंतीची भाषा निवडा आणि SMS, कॉन्टॅक्ट्स आणि लोकेशनसारख्या अॅक्सेसला परवानगी द्या.
स्टेप-४
यानंतर तुम्हाला तुमचे बँक खाते अॅपमध्ये जोडावे लागेल. PhonePe/Google Pay अॅप तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या बँकांची यादी दाखवेल. त्या यादीतून तुमची बँक निवडा, आणि अॅप तुम्ही आधी व्हेरिफाय केलेल्या मोबाइल नंबरचा वापर करून तुमचे बँक खाते आपोआप शोधून काढेल. जर सर्व माहिती जुळत असेल, तर तुमचे खाते ओळखले जाईल आणि तुम्ही UPI पिन सेट करण्यासाठी पुढे जाऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डची गरज भासेल.
स्टेप-५
आता तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डच्या शेवटच्या ६ अंकांची संख्या आणि कार्डची एक्सपायरी डेट भरावी लागेल. त्यानंतर बँकेकडून तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. हा OTP भरल्यानंतर तुम्ही तुमचा UPI पिन सेट करू शकाल. पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही PhonePe किंवा Google Pay द्वारे पेमेंट कराल, तेव्हा हाच पिन वापरावा लागेल.
स्टेप-६
एकदा तुमचा UPI पिन सेट झाला की, तुमचे PhonePe/Google Pay खाते पूर्णपणे अॅक्टिव्ह होईल आणि वापरासाठी सज्ज होईल. आता तुम्ही या अॅपच्या मदतीने पैसे पाठवू किंवा स्वीकारू शकता, बिलांचे पेमेंट करू शकता, मोबाइल रिचार्ज करू शकता किंवा ऑनलाईन खरेदीही करू शकता.