ट्विटरचा जुना लूक मिळवण्यासाठी काय कराल?
Twitter आता नव्या रुपात आलं आहे. ट्विटरचं हे लूक अगोदरच लाँच करण्यात आलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे नवीन ट्विटर इन्टरफेस सर्वचजण वापरु शकत आहेत. मात्र, ट्विटरचा हा नवा अवतार युझर्ससाठी डोकेदुखी ठरतो आहे.
मुंबई : Twitter आता नव्या रुपात आलं आहे. ट्विटरचं हे लूक अगोदरच लाँच करण्यात आलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे नवीन ट्विटर इन्टरफेस सर्वचजण वापरु शकत आहेत. मात्र, ट्विटरचा हा नवा अवतार युझर्ससाठी डोकेदुखी ठरतो आहे. अनेकांना ट्विटरचा हा नवा लूक आवडलेला नाही, तर अनेकांना सध्या ट्विटर इन्टरफेस वापरताना चिडचिड होत आहे, ते त्रासदायक वाटतो आहे. जर तुम्हालाही ट्विटरचा हा नवा लूक आवडत नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक खास माहिती घेऊल आलो आहे, ज्यामुळे तुम्ही जुन्या ट्विटर इन्टरफेसला पुन्हा वापरु शकाल.
ट्विटरच्या नव्या इन्टरफेसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यासोबतच यामध्ये अनेक नवीन फायद्याचे फिचर्सही देण्यात आले आहेत. पण, ट्विटरने असा कुठलाही पर्याय सांगितलेला नाही, ज्यामुळे युझर पुन्हा जुन्या ट्विटर इन्टरफेसवर जाऊ शकाल. म्हणूनच आम्ही तुम्हाला जुनं ट्विटर इन्टरफेस पुन्हा कस वापरता येईल, हे सांगणार आहोत. त्याचे दोन पर्याय आहेत.
पहिला पर्याय :
- Twitter लॉग इन करुन More या ऑप्शनवर क्लिक करा, हे ऑप्शन प्रोफाईलच्या डाव्या बाजूला मिळेल.
- त्यानंतर सेटिंग्स आणि प्रायव्हसी ऑप्शनला सिलेक्ट करा, इथे तुम्हाला अनेक ऑप्शन्स मिळतील.
- About Twitter हे ऑप्शन सिलेक्ट करा.
- उजव्या बाजूच्या लिस्टमध्ये Directory हे ऑप्शन दिसेल, हे ऑप्शन सिलेक्ट करा.
आता तुम्ही Home टॅबवर क्लिक करु शकता. त्यानंतर तुम्हाला जुनं ट्विटर इन्टरफेस दिसेल. पण, तुम्ही या टॅबला बंद केल्यानंतर किंवा लॉग आऊट केल्यानंतर तुम्हाला परत नवीन ट्विटर इन्टरफेस दिसेल.
दुसरा पर्याय :
दुसरा पर्याय थर्ड पार्टी एक्स्टेंशन आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझरमध्ये एक्स्टेंशन डाऊनलोड करुन सेट करावं लागेल. GoodTwitter नावाचं एक्स्टेंशन आहे. हे एक्स्टेंशन क्रोम व्यतिरिक्त फायरफॉक्सवरही उपलब्ध आहे. याला डाऊनलोड करुन इन्स्टॉल केल्यानंतर Twitter ओपन कराल तेव्हा तुम्हाला जुनं इन्टरफेस दिसेल.
पण, हे एक्स्टेंशन वापरायचं, की नाही ते पूर्णपणे युझरवर अवलंबून आहे. ‘टीव्ही-9’ अशा कुठल्याही प्रकारचं एक्स्टेंशन वापरण्याचा सल्ला देत नाही.
संबंधित बातम्या :
TikTok ची कंपनी स्वत:चा स्मार्टफोन आणणार, लवकरच लाँच होण्याची शक्यता
10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे फिटनेस बँड
TrueCaller चा मोठा घोटाळा उघड, ट्विटरवर तक्रारींचा महापूर
Hotstar आणि Amazon ला टक्कर देण्यासाठी Netflix चा नवा प्लॅन, किंमत फक्त…