आता परवानगीशिवाय Facebook Profile पाहता येणार नाही, फेसबुकचं नवं फीचर

फेसबुक त्यांच्या वापरकर्त्यांसाठी (युजर्स) अनेक नवीन फीचर्स, प्रायव्हसी सेटिंग्ज आणि नियम आणत आहे.

आता परवानगीशिवाय Facebook Profile पाहता येणार नाही, फेसबुकचं नवं फीचर
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 1:39 PM

मुंबई : फेसबुक त्यांच्या वापरकर्त्यांसाठी (युजर्स) अनेक नवीन फीचर्स, गोपनीयता सेटिंग्ज आणि नियम आणत आहे. हे फीचर्स फेसबुकवर सक्रिय नसलेल्या वापरकर्त्यांना माहित नाहीत. या सर्वांमध्ये एक फीचर असं आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमची फेसबुक प्रोफाईल पूर्णपणे लॉक करू शकता. कोणत्याही फेसबुक वापरकर्त्यास तुमची प्रोफाइल किंवा फोटो पाहण्याची इच्छा असेल तर सर्वप्रथम त्याला तुमच्या परवानगीची आवश्यकता असेल. (How to lock your Facebook profile using your Android smartphone or iPhone)

फेसबुकवर बरेच वापरकर्ते आहेत जे त्यांच्या टाइमलाइनवर पोस्ट करतात किंवा त्यांनी अपलोड केलेल्या फोटोमध्ये तुम्हाला टॅग करतात. परंतु तुम्हाला याबाबत माहिती आहे का की, तुम्ही हे बदलू शकता. सध्या डेस्कटॉप पेजवर हे कंट्रोल उपलब्ध नाही. परंतु फेसबुक अॅप आणि फेसबुक मोबाइल पेजवर तुम्ही याच्या सेटिंग्स बदलू शकता.

फेबसुक प्रोफाईल अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  1. यासाठी सर्वात आधी तुम्हाला अॅप किंवा फेसबुक पेजवर जावं लागेल. वरच्या बाजूला जे टॅब आहेत तिथे टाईमलाईन आयकॉन दिसेल, हा आयकॉन घराप्रमाणे आहे. त्यानंतर तुमच्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा आणि प्रोफाईल ओपन करा.
  2. अॅड स्टोरी बटनच्या शेजारी तीन डॉट मेनू दिसतील. हा मेनू ओपन करुन लॉक प्रोफाईलवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लॉक युवर प्रोफाईल फ्रॉम डिस्ट्रॅक्शन बाय युवर फ्रेंड्स (Lock your profile from distraction by your friends) या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला पाहता येईल की तुमच्या प्रोफाईलमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत. आता प्रोसीड बटणवर क्लिक करुन प्रोफाईल लॉक करा.

प्रोफाल अनलॉक कशी कराल?

भविष्यात, जेव्हा तुम्हाला तुमची प्रोफाईल अनलॉक करायची असल्यास, फेसबुक तुम्हाला यासंबधित पर्याय देखील देतं. यासाठी, तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर परत जावे लागेल आणि नंतर तीन डॉट मेनूवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर अनलॉक प्रोफाइलवर क्लिक करावे लागेल.

हेही वाचा

‘रिअल मी’चा 5 जी स्मार्टफोन लवकरच बाजारात, ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक सुविधा मिळणार

भारतात लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, कमी किंमतीत मिळणार हे शानदार फिचर्स

अ‍ॅपल वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच, पुढील वर्षी स्मार्टवॉच बाजारात आणण्याची फेसबुकची योजना

(How to lock your Facebook profile using your Android smartphone or iPhone)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.