केव्हा पण जाणून घ्या कोणाचेही लोकेशन; Google Maps ची ही ट्रिक माहिती आहे का?
Google Map Location : जर तुम्हाला कुणाचे लोकेशन माहिती करुन घ्यायचे असेल तर त्याला गुगल मॅपवर ट्रॅक करावे लागते. गुगल मॅपच्या या खास फीचरच्या मदतीने तुम्ही कुणाचे पण लोकेशन जाणून घेऊ शकता, काय आहे ती ट्रिक?
जगातील सर्वात लोकप्रिय नॅव्हिगेशन ॲप Google Maps मध्ये अनेक फीचर आहेत. पण अनेक युझर्स केवळ अंतर जाणून घेण्यापूरतं अथवा एखाद्या लोकेशनवर पोहचण्यापूरताच त्याचा वापर करतात. पण गुगल मॅप्सचा अजूनही एक वापर करता येतो, तुम्हाला दुसऱ्या कुणाचे लोकेशन ट्रॅक करायचे असेल तर ते माहिती करता येते. त्यासाठी Location Sharing या फीचरचा वापर करावा लागतो. हे फीचर कसे इनेबल करायचे आणि त्याच्या मदतीने तुम्ही समोरील व्यक्तीला कसे ट्रॅक करतात, हे यातून समोर येईल.
गुगलने ॲपमध्ये लोकेशन शेअरिंगचा पर्याय दिला आहे. त्याआधारे तुम्ही स्वतःचे लोकेशन समोरील व्यक्तीला शेअर करू शकतात. त्याआधारे तुम्हाला जवळील व्यक्ती नेमकी कुठं आहे, हे समोर येईल. पण एक खूणगाठ बांधून ठेवा की, कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचे लोकेशन ट्रॅक करणे हे बेकायदेशीर कृत्य आहे. त्यामुळे त्याचा खासगीपणाचा अधिकार भंग होतो. Google Maps फीचरचा वापर तेव्हाच करणे योग्य ठरते, जेव्हा तो लोकेशन ट्रॅक करायला परवानगी देईल. नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
असे करा लोकेशन शेअरिंग इनेबल फीचर
सर्वात आधी Google Maps ॲप उघडा
त्यानंतर तुमच्या प्रोफाईल ऑयकॉनवर टॅप करा
Location Sharing हा पर्याय निवडा
आता ज्यांच्यासोबत लोकेशन शेअर करायचे ते निवडा
किती वेळ लोकेशन शेअर करायचे ते पण निवडा
युझरचे लोकेशन असे करा ट्रॅक
डिव्हाईसमध्ये गुगल मॅप्स उघडा. ज्या युझर्सचे लोकेशन ट्रॅक करायचे असेल, त्या युझर्सच्या नावावर टॅप करा. लागलीच तुमचे सध्याचे लोकेशन समोरील व्यक्तीला दिसू लागेल. तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला सुद्धा लोकेशन शेअर करण्यास सांगू शकता.
टोल वाचवा गुगल मॅपच्या आधारे
तुम्ही गुगल मॅप्सचा थ्री डॉटवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील. यामधील पहिल्या Options या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला Avoid Tolls हा पर्याय समोर दिसेल. तुम्ही जेव्हा या सीक्रेट फीचरला ऑन कराल. गुगल मॅप्स तुम्हाला असा रस्ता दाखवेल, जिथे तुम्हाला टोल नाका लागणार नाही आणि तुमच्या पैशांची बचत होईल.