पॅटर्न लॉक विसरलात? अनलॉक करण्याच्या खास ट्रिक्स

मुंबई : फोटो, व्हिडीओ आणि कॉन्टॅक्ट सुरक्षित ठेवण्यासाठी आपण फोनमध्ये पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक ठेवतो. पण बऱ्याचदा आपण पॅटर्न लॉक विसरतो. अशा वेळी करायचं काय, हा प्रश्न आपल्यासमोर पडतो. पण पॅटर्न लॉक विसरला असाल तरीही चिंता करु नका. कारण, यावर सोपा पर्याय तुमच्या मोबाईलमध्येच आहे. अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजरचा वापर करा ही पद्धत अशा फोनमध्ये काम […]

पॅटर्न लॉक विसरलात? अनलॉक करण्याच्या खास ट्रिक्स
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : फोटो, व्हिडीओ आणि कॉन्टॅक्ट सुरक्षित ठेवण्यासाठी आपण फोनमध्ये पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक ठेवतो. पण बऱ्याचदा आपण पॅटर्न लॉक विसरतो. अशा वेळी करायचं काय, हा प्रश्न आपल्यासमोर पडतो. पण पॅटर्न लॉक विसरला असाल तरीही चिंता करु नका. कारण, यावर सोपा पर्याय तुमच्या मोबाईलमध्येच आहे.

अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजरचा वापर करा

ही पद्धत अशा फोनमध्ये काम करणार ज्या फोनमध्ये अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजर चालू आहे. यासाठी तुम्हाला अँड्रॉईड डिवाईसच्या वेबसाईटला जाऊन गुगल अकाउंटने लॉग इन करावे लागेल. लक्षात ठेवा, हे तेच अकाउंट पाहिजे जे तुमच्या फोनमध्ये जोडलेले असेल. लॉग इन केल्यानंतर ‘इरेज’वर क्लिक करा. ज्याने तुमची फोन फॅक्टरी रिसेट होईल यानंतर तुम्ही पुन्हा फोनचा पासवर्ड रिसेट करु शकता. पण या ट्रिकमुळे तुमच्या फोनमधील सर्व डेटा डिलीट होईल.

जर अँड्रॉईडचा जुना फोन वापरत असाल

जर तुम्ही अँड्रॉईड 4.4 किंवा त्याच्या आधीचा कोणता वर्जन वापरत असाल तर ही ट्रिक तुमच्यासाठी आहे. यासाठी तुम्हाला पाच वेळा चुकीचा पासवर्ड टाकावा लागणार आहे. तेव्हा तुम्हांला forgot pin, forgot pattern आणि forgot password चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करुन तुमचा इमेल लॉग इन करा. यानंतर तुम्हाला पासवर्ड रिसेटचा पर्याय दिसेल. विशेष म्हणजे या ट्रिकमुळे तुमचा डेटा सुरक्षित राहतो.

जेव्हा कोणतीच ट्रिक उयोगी पडत नाही

जर या सर्व ट्रिक उपयोगी पडत नसतील तर तुमच्याकडे एक शेवटचा पर्याय असतो. फॅक्टरी रिसेटचा, पण फोन अनलॉक केल्याशिवाय या ट्रिकचा उपयोग होणार नाही. त्यामुळे यासाठी तुम्हाला हार्ड रिसेट करावा लागणार. यासाठी तुम्हाला पॉवर आणि वॉल्यूमचे बटन एकत्र थोडा वेळ दाबून ठेवावे लागेल. त्यानंतर फोन रिकव्हरी मोडमध्ये येईल. रिकव्हरी चालू झाल्यावर स्क्रीनवर दाखवण्यात आलेल्या स्टेप फॉलो करा आणि तुम्ही फॅक्टरी रिसेट करुन नवीन पासवर्ड रिसेट करु शकता.

गुगल असिस्टंटचा वापर करु शकता

जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये गुगल असिस्टंट सेट केलं आहे आणि तुमचा व्हॉईस रेकॉर्ड केला असेल. तर ‘अनलॉक द व्हॉईस’च्या पर्यायावर क्लिक करा आणि ‘ओके गुगल’ बोलून फोन अनलॉक करू शकता.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.