Huawei चा गुगलला झटका, नवं ऑपरेटिंग सिस्टीम HarmonyOS लाँच
गेल्या अनेक काळापासून चर्चेत असलेलं Huawei चं ऑपरेटिंग सिस्टीम अखेर लाँच झालं आहे. याच्या ग्लोबल व्हर्जनचं नाव HarmonyOS आहे. हे ऑपरेटिंग सिस्टीम स्मार्टफोन, स्मार्ट स्पीकर्स तसेच सेंसर्ससोबतही कम्पॅटिबल आहे, असं कंपनीचे संचालक रिचर्ड यू यांनी सांगितलं.
मुंबई : गेल्या अनेक काळापासून चर्चेत असलेलं Huawei चं ऑपरेटिंग सिस्टीम अखेर लाँच झालं आहे. कंपनीने चीनमध्ये या ओएसला HongmengOS नावाने लाँच केलं. याच्या ग्लोबल व्हर्जनचं नाव HarmonyOS आहे. हे ऑपरेटिंग सिस्टीम स्मार्टफोन, स्मार्ट स्पीकर्स तसेच सेंसर्ससोबतही कम्पॅटिबल आहे, असं कंपनीचे संचालक रिचर्ड यू यांनी सांगितलं.
सर्वात आधी स्मार्ट स्क्रिन प्रॉडक्ट्स साठी उपलब्ध असेल
HarmonyOS ऑपरेटिंग सिस्टीमला सर्वात आधी स्मार्ट स्क्रिन प्रॉडक्ट्स जसे टीव्ही आणि स्मार्टफोन्सवर वापरल्या जाईल. येत्या तीन वर्षांमध्ये कंपनी याला दूसऱ्या डिव्हाईस विअरेबल्स आणि कार हेड यूनिटसाठी उपलब्ध करवून देईल. कंपनीने या ओएसला सध्या चीनमध्ये लाँच केलं आहे. येणाऱ्या काळात याला जागतिक स्तरावर लाँच केलं जाईल.
A modularized #HarmonyOS can be nested to adapt flexibly to any device to create a seamless cross-device experience. Developed via the distributed capability kit, it builds the foundation of a shared developer ecosystem #HDC2019 pic.twitter.com/2TD9cgtdG8
— Huawei Mobile (@HuaweiMobile) August 9, 2019
Huawei चा HarmonyOS एक ओपन सोर्स आहे. म्हणजेच जगातील कुठलीही स्मार्टफोन कंपनी या ऑपरेटिंग सिस्टीमला वापरु शकते. Huawei या ओएस सोर्सला उपलब्ध करवून जगभरातील अॅप डेव्हलपर्सला यासाठी कम्पॅटीबल अॅप बनवण्यासाठी प्रेरित करणार आहे. कारण, ऑपरेटिंग सिस्टीमला यशस्वी बनवण्यासाठी जास्तीत जास्त कम्पॅटीबल अॅप्सची गरज असते, हे कंपनीला माहीत आहे.
लहान हार्डवेअर डिव्हाईसेसवरही काम करेल
जगभरात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे अँड्रॉईड आणि आय ओएस हे इंटरनेटशी कनेक्ट होणाऱ्या डिव्हाईसेसला सपोर्ट करत नाहीत, असं रिचर्ड यू यांनी सांगितलं. HarmonyOS बनवण्यामागे मुख्य कारण म्हणजे, हे एक सिंगल सॉफ्टवेअर तयार करणार आहे. जो जास्त मेमरी आणि पावरच्या स्मार्टफोन,लॅपटॉपसोबतच इतर लहान हार्डवेअरचा वापर करण्यात आलेल्या डिव्हाईसेसवरही काम करेल.
For the first time, #HarmonyOS will have a verified TEE (Trusted Execution Environment). Improving connected security across multiple smart devices in a connected all-scenario world #HDC2019 pic.twitter.com/o1TF54Hjkc
— Huawei Mobile (@HuaweiMobile) August 9, 2019
HarmonyOS वर स्विच करणे सोपं
Huawei चा हा ऑपरेटिंग सिस्टीम स्मार्टफोन्स आणि लॅपटॉपसाठी चीन मध्ये या वर्षांच्या अखेरिस रिलीज केला जाईल. तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये कंपनी 2020 मध्ये लाँच करेल, अशी माहिती यू यांनी दिली.
अँड्रॉईडला पहिली पसंती
Huawei च्या स्मार्टफोन्समध्ये अँड्रॉईड सिस्टीमलाच प्राथमिकता दिली जाते. पण, जर कंपनीला HarmonyOS वर स्विच करण्याची गरज पडली, तर त्यामध्ये कुठलीही समस्या उद्भवणार नाही. नव्या ऑपरेटिंग सिस्टीमवर स्विच करण्यासाठी एक-दोन दिवसांचा वेळ लागेल आणि हे खूप सोपं आहे.
संबंधित बातम्या :
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी नवं फीचर
तुम्हीही कॉल ड्रॉपला वैतागले आहात? तक्रार कुठे आणि कशी करायची?
Vodafone ची बंपर ऑफर, 1 वर्ष दररोज 1.5GB डेटा आणि कॉलिंग मोफत
TikTok ची कंपनी स्वत:चा स्मार्टफोन आणणार, लवकरच लाँच होण्याची शक्यता