जबरदस्त फीचर्ससह Huawei चा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, भारतात सेल कधी?

चीनमधील आघाडीची स्मार्टफोन निर्माती कंपनी Huawei ने नुकताच त्यांचा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. (Huawei Mate X2)

जबरदस्त फीचर्ससह Huawei चा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, भारतात सेल कधी?
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 1:07 PM

मुंबई : चीनमधील आघाडीची स्मार्टफोन निर्माती कंपनी Huawei ने नुकताच त्यांचा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. Huawei Mate X2 असं या स्मार्टफोनचं नाव आहे. हा फोन Huawei Mate X चं अपडेटेड वर्जन आहे. Mate X2 फोन Mate X च्या तुलनेत पूर्णपणे वेगळी फोल्डिंग सिस्टिम प्रदान करतो. हा फोन बाहेरच्या बाजूला फोल्ड न होता आतल्या बाजूला फोल्ड होतो. Huawei Mate X2 चार कलर ऑप्शन आणि दोन रॅम + स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच हा क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि सिंगल सेल्फी शूटरसह सादर करण्यात आला आहे. (Huawei Mate X2 Foldable Smartphone With 8-inch Display Price and Specification)

फोटो आणि व्हिडीओसाठी Huawei Mate X2 एक क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर यात f / 1.9 लेंस आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशन (OIS) सपोर्टचा समावेश आहे. एका अल्ट्रा-वाइड-अँगल सह 16-मेगापिक्सलचा सेंसर आहे, f/ 2.2 लेंस, f / 2.4 अपर्चर आणि OIS सपोर्ट वाला 12-मेगापिक्सलचा टेलीफोटो शूटर आहे, आणि f / 4.4 अपर्चर, OIS आणि 10x ऑप्टिकल झुमसह 8-मेगापिक्सलचा सुपरझुम कॅमेरा देण्यात आला आहे. तर या फोनच्या फ्रंटला सेल्फीसाठी f / 2.2 लेंससह 16 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटी आणि किंमत

Huawei Mate X2 वर कनेक्टिव्हिटी साठी 5 जी, 4 जी एलटीई, डुअल-बँड वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एनएफसी आणि चार्जिंगसाठी एका यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश करण्यात आला आहे. हा फोन सध्या चीनमध्ये सादर करण्यात आला आहे आहे. Huawei Mate X2 च्या 8GB + 256GB वेरिएंटची किंमत CNY 17,999 (जवळपास 2.01 लाख रुपये) आणि 8GB + 512GB वेरिएंटची किंमत CNY 18,999 (जवळपास 2.12 लाख रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, आइस क्रिस्टल ब्लू, आइस क्रिस्टल पावडर आणि व्हाइट ग्लेज कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन जागतिक बाजारात किंवा भारतात कधी लाँच केला जाईल, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

जबरदस्त डिस्प्ले

डुअल-सिम (नॅनो) Huawei Mate X2 अँड्रॉयड 10 आणि EMUI 11.0 वर चालतो. या फोनला बाहेरच्या बाजूस 6.6 इंचांचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1,160×2,700 पिक्सल रिजॉल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz, तर 240Hz टच सँपलिंग रेट आणि 456ppi पिक्सल डेन्सिटी मिळाली आहे. तर 8 इंचांचा ओएलईडी डिस्प्लेदेखील देण्यात आला आहे. जो 2,200×2,480 पिक्सेलसह मिळेल. ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पल रेट आणि 413ppi पिक्सेल डेंसिटी देण्यात आली आहे. हा फोन ऑक्टा-कोर किरिन 9000 SoC आणि माली-G78 GPU द्वारे संचालित आहे.

हेही वाचा

40% डिस्काऊंटसह Samsung, Oneplus, Xiaomi, Apple चे स्मार्टफोन्स खरेदी करा

ट्रिपल कॅमेरासह Redmi 9 Power चं 6GB रॅम वेरिएंट भारतात लाँच, किंमत…

64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, इन्स्टंट डिस्काऊंटसह Samsung Galaxy F62 चा पहिला सेल

6000mAh बॅटरी, 48MP ट्रिपल कॅमेरा, कॅशबॅक ऑफरसह POCO M3 खरेदी करा

(Huawei Mate X2 Foldable Smartphone With 8-inch Display Price and Specification)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.