Honor 20 चे 3 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत आणि फिचर
चीनची दिग्गज स्मार्टफोन कंपनी हुवावेच्या Honor ब्रँडने मंगळवारी Honor 20 सीरीजचे 3 स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. Honor 20 Pro, Honor 20 आणि Honor 20i अशी या स्मार्टफोनची नावे आहेत.
नवी दिल्ली: चीनची दिग्गज स्मार्टफोन कंपनी हुवावेच्या Honor ब्रँडने मंगळवारी Honor 20 सीरीजचे 3 स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. Honor 20 Pro, Honor 20 आणि Honor 20i अशी या स्मार्टफोनची नावे आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे 39,999 रुपये, 32,999 रुपये आणि 14,999 रुपये एवढी आहे.
Honor 20 Pro फँटम ब्लू कलरमध्ये, Honor 20 सफायर ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल. Honor 20i मिडनाइट ब्लॅक, फँटम ब्लू आणि फँटम रेड कलरमध्ये उपलब्ध होईल. Honor इंडियाचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर सुहेल तारीक म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या किमतीत 3 स्मार्टफोन आणत आहोत. यामुळे आमच्या ग्राहकांना सर्वात कमी किमतीत सर्वात चांगले स्मार्टफोन मिळतील.”
भारतात स्मार्टफोनचा एक विशेष बाजार आहे. त्यामुळे Honor 20 सीरीजच्या इनोव्हेशनवर आमचे नेहमीच लक्ष राहिले आहे, असेही तारीक यांनी यावेळी नमूद केले. Honor 20 Pro मध्ये 8 GB रॅम आणि 256 GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे. Honor 20 मध्ये 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त Honor 20i मध्ये 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे.
फ्लिपकार्टवर 18 जूनपासून Honor 20i स्मार्टफोनची आणि 25 जूनपासून Honor 20 ची विक्री सुरु होईल. Honor 20 Pro बाजारात कधी उपलब्ध होईल याची लवकरच घोषणा होणार आहे. Honor 20 Pro मध्ये 48 मेगापिक्सलचा सोनी आयएमएस 586 हा मुख्य कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा टेली फोटो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आहे.
संबंधित बातम्या:
10 हजारांपेक्षा कमी किमतीत 6 GB रॅमसह 4 कॅमेरांचा स्मार्टफोन