Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp बॅन केल्यास भारताचा ‘या’ 5 देशांच्या यादीत समावेश

नव्या आयटी नियमांबाबत व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि भारत सरकार यांच्यात सातत्याने वाद सुरू आहे. (5 countries where whatsapp is banned)

WhatsApp बॅन केल्यास भारताचा 'या' 5 देशांच्या यादीत समावेश
Whatsapp
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 11:16 PM

मुंबई : नव्या आयटी नियमांबाबत व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि भारत सरकार यांच्यात सातत्याने वाद सुरू आहे. नव्या नियमांबाबत व्हॉट्सअ‍ॅपने अलीकडेच न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. व्हॉट्सअ‍ॅपला सरकारने दिलेल्या आदेशाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने असे म्हटले आहे की, ते असं करु शकत नाही, कारण ते त्यांच्या धोरणाच्या विरोधात आहे. चुकीचे मेसेज पाठविणार्‍या ओरिजिनल सेंडरचा मागोवा घेतल्यास बनावट बातम्यांना आळा घालता येईल, असे सरकारने यापूर्वी सांगितले होते. (If India banned WhatsApp then it will be included in these 5 countries list where whatsapp is already banned)

व्हॉट्सअ‍ॅपने सरकारविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, ज्यात असे म्हटले होते की 25 मेपासून हे कलम लागू होण्यापासून रोखले पाहिजे. सरकारने त्यांचे नियम मान्य करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना जी मुदत दिली होती, 25 मे हा त्या मुदतीचा शेवटचा दिवस होता.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकार आपल्या नागरिकांच्या गोपनीयतेच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, परंतु राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करणे ही सरकारचीही जबाबदारी आहे. पुढील 15 दिवसांत व्हॉट्सअ‍ॅपने सरकारच्या नियमांचे पालन न केल्यास ते त्यांचं स्टेटस गमावू शकतात. भारतात या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली जाईल किंवा नाही, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी जगभरात काही देश आहेत ज्या देशांनी आधीच व्हॉट्सअॅप बॅन केलं आहे. जगभरात असे 5 देश आहेत.

चीन

चीनने 2017 मध्येच व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी घातली होती आणि आतापर्यंत त्यावरील बंदी हटविण्यात आलेली नाही. मेसेजिंग अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली होती कारण सरकारला येथील सामग्रीवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा होती. अहवालात असेही सांगण्यात आले आहे की व्हॉट्सअॅपवर चीनमध्ये बंदी घालण्यात आली होती जेणेकरून व्हीचॅट (WeChat) हे अ‍ॅप प्रमोट करता येईल.

उत्तर कोरिया

उत्तर कोरिया हा चीननंतरचा दुसरा असा देश आहे जिथे व्हॉट्सअ‍ॅपवर मजबूत एनक्रिप्शन धोरणामुळे बंदी घातली गेली आहे. किम जोंगच्या सरकारने वर्ष 2018 मध्ये या अ‍ॅपवर कायमची बंदी घातली आहे. मुळात उत्तर कोरियामध्ये इंटरनेट नाही. केवळ परदेशी आणि स्थानिक अभिजात नागरिक वायरलेस इंटरनेट कनेक्शन चालविण्यास सक्षम आहेत.

UAE (संयुक्त अबर अमिराती)

युएई व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल आणि फेसटाइमला परवानगी देत ​​नाही. तिथे व्हॉट्सअ‍ॅपच्या एन्क्रिप्शन पॉलिसीमध्ये कोणतीही समस्या नाही. स्थानिक दूरसंचार आणि देशाच्या महसुलामुळे युएईला चालना मिळू शकेल यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

सीरिया

या देशातही व्हॉट्सअ‍ॅपच्या एनक्रिप्शन पॉलिसीवर बंदी घालण्यात आली आहे. सीरियन सरकारने असे म्हटले आहे की, शत्रू एंड टू एंड एन्क्रिप्शनचा वापर करून त्यांच्या देशाविरोधात कट रचू शकतो.

इराण

अलीकडे या देशात सर्व मेसेजिंग अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप, सिग्नल यांचा समावेश आहे. या सर्वांवर गोपनीयता धोरणामुळे बंदी घालण्यात आली होती. 2019 मध्ये ट्विटर आणि फेसबुकवरही इराणने बंदी घातली होती.

संबंधित बातम्या

WhatsApp Controversy | सोशल मीडियाबाबतच्या नव्या नियमांमुळे नागरिकांनी घाबरू नये : केंद्र सरकार

जाणून घ्या काय आहे ‘राइट टू प्रायव्हसी’, व्हॉट्सअ‍ॅपच्या विवादानंतर आले चर्चेत

नव्या डिजिटल नियमांचे पालन करु; केंद्र सरकारसमोर Facebook ची माघार

(If India banned WhatsApp then it will be included in these 5 countries list where whatsapp is already banned)

'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला.
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले.
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा.
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना.
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं.
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण.
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.