ऑनलाईन विकत असाल जुना फोन तर वापरा या टिप्स, मिळेत तगडी डिल

जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल आणि नवीन फोन विकत घेण्यासाठी तुम्हाला तो विकायचा (Used Smartphone) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असणार आहे.

ऑनलाईन विकत असाल जुना फोन तर वापरा या टिप्स, मिळेत तगडी डिल
स्मार्टफोन ऑनलाईन विकतांना..Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 9:12 PM

मुंबई : आजकाल अनेक सुविधांनी युक्त स्मार्टफोन बाजारात येऊ लागले आहेत. आता जवळपास सर्वच लोक 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत. आजकाल मोठे डिस्प्ले, दीर्घ बॅटरी लाइफ असलेले फोन येऊ लागले आहेत. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल आणि नवीन फोन विकत घेण्यासाठी तुम्हाला तो विकायचा (Used Smartphone) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धती सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर चांगली डील मिळवू शकता.

वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाहिरात टाका

तुमच्याकडे जुना फोन असेल आणि तो विकायचा असेल तर तुम्ही OLX, Quikr सारख्या प्लॅटफॉर्मवर त्याची यादी करू शकता. फोन विकण्याआधी लक्षात ठेवा की त्याची फक्त एकाच ठिकाणी जाहिरात देवू नका. स्वतंत्रपणे सूचीबद्ध केल्याने तुमच्या फोनवर चांगली डील मिळण्याची शक्यता वाढते.

चांगले फोटो पोस्ट करा

अनेक वेळा फोन ऑनलाइन विकताना लोकांना त्याचा फोटो नीट लावता येत नाही. तुम्हाला जुन्या फोनवर चांगली डील हवी असल्यास, उच्च दर्जाचे फोटो क्लिक करा आणि पोस्ट करा. यामुळे तुमच्या फोनवर चांगली डील मिळण्याची शक्यता वाढते कारण वापरकर्ता प्रथम तुमच्या फोनची स्थिती तपासतो. जर तुमचा फोन इमेजमध्ये चांगला दिसत असेल तर वापरकर्ता तो विकत घेण्याचे ठरवेल. जुना फोन सूचीबद्ध करण्यापूर्वी, त्याचे चांगले फोटो क्लिक करण्यास विसरू नका.

हे सुद्धा वाचा

तपशीलवार वर्णन लिहा

जर तुम्हाला जुन्या फोनवर चांगली डील हवी असेल तर त्याची वैशिष्ट्ये आणि तपशिल योग्यरित्या सूचीबद्ध करा. उत्पादनाचे वर्णन नीट लिहून, समोरच्या व्यक्तीला स्मार्टफोनच्या स्थितीबद्दल माहिती मिळते. तुमच्या जुन्या फोनमध्ये काही क्रॅक किंवा खूण असल्यास नक्की सांगा. याशिवाय स्पेसिफिकेशन्स, वॉरंटी आणि अॅक्सेसरीजची माहिती द्या.

वैयक्तिक माहितीला  प्राधान्य नको

जेव्हा तुम्ही तुमचा फोन ऑनलाइन विकायला जाल तेव्हा तिथे तुमची जास्त वैयक्तिक माहिती शेअर करू नका. फोनची ऑनलाइन विक्री करताना,  तुमची वैयक्तिक माहिती टाकण्याचे टाळा. कारण ऑनलाइन जगात काही धोके आहेत. तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाऊ शकते.

अॅसेसरीज असल्यास उत्तम

तुम्हाला तुमच्या फोनवर चांगली डील हवी असल्यास, तुम्ही कोणत्याही अतिरिक्त ऍक्सेसरीचा समावेश करू शकता. असे केल्याने ग्राहकांना आकर्षित करता येईल. तुम्ही काही जुने हेडफोन, कोणतेही केबल्स किंवा अडॅप्टर यासारख्या गोष्टी ठेवू शकता. तुम्ही फोनसोबत त्याचे बॅककव्हर देखील देऊ शकता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.