WhatsApp चे शॉर्टकट; असे व्हा एक्सपर्ट! दोनच मिनिटांत मित्रांवर टाका इम्प्रेशन
WhatsApp | प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप ठाण मांडून बसलेले आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये ते इनबिल्ट असते. व्हॉट्सॲपचा वापर करत असाल तर तुम्हाला कीबोर्डचे हे शॉर्टकट माहिती असणे आवश्यक आहे. वेब व्हॉट्सॲपचा वापर करताना हे शॉर्टकट माहिती असतील तर तुम्ही एक्सपर्ट ठराल. कीबोर्डवरची ही जादू इतरांना इम्प्रेस करेल.
नवी दिल्ली | 19 जानेवारी 2024 : WhatsApp चा जगभरातील कोट्यवधी लोक दररोज वापर करतात. व्हॉट्सॲप हे केवळ चॅटिंगपुरते मर्यादीत राहिलेले नाही. त्यावरुन आता ऑडिओ, व्हिडिओ कॉल, शॉर्ट मिटिंग्स, बिझनेस, पैसे हस्तांतरण, भिशीच्या बोली आणि इतर अनेक गोष्टी लोक त्यांच्या स्वयंस्फुर्तीने करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून कार्यालयात काम करणारे कर्मचारी वेब व्हॉट्सॲपचा खुबीने वापर करतात. त्यामुळे कार्यालयीन संबंधीची कामे आणि चॅटिंग सहज करता येते. त्याला गती मिळते. पण या काही ट्रिक आणि टिप्स फॉलो केल्या. हे शॉर्टकट माहिती असले तर तुम्हाला व्हॉट्सॲपचा झटपट वापर करता येईल. कोणत्या आहेत या खास कीबोर्ड ट्रिक, जाणून घ्या…
कोणती आहेत शॉर्टकट
व्हॉट्सॲप वेब अनेक कीबोर्ड शॉर्टकटचा फायदा देते. तुम्हाला काही कामे झटपट उरकायची असतील तर या शॉर्टकटमुळे ती झटपट होतात. चला तर जाणून घेऊयात ही खास शॉर्टकट
- Ctrl + N : नवीन चॅट करण्यासाठी कंट्रोल आणि N प्रेस करा
- Ctrl + Shift + ] : पुढील चॅट करण्यासाठी कंट्रोलसह Shift सह या चिन्हाची कळ दाबा
- Ctrl + Shift + [ : मागील चॅट पाहण्यासाठी कंट्रोलसह Shift आणि चिन्हाची कळ दाबा
- Ctrl + E : कोणताही कॉन्टॅक्ट सर्च करण्यासाठी कंट्रोल सह E प्रेस करा
- Ctrl + Shift + M : कोणत्याही चॅटला Mute/unmute करण्यासाठी कंट्रोलसह Shift आणि M दाबा
- Ctrl + Backspace : सिलेक्ट केलेले चॅट डिलीट करण्यासाठी कंट्रोल आणि Backspace चा वापर करा
- Ctrl + Shift + U : चॅटला रीड मार्क करण्यासाठी कंट्रोलसह Shift आणि U प्रेस करा
- Ctrl + Shift + N : नवीन ग्रुप तयार करण्यासाठी कंट्रोलसह Shift आणि N प्रेस करा
कसे करेल कनेक्ट व्हॉट्सॲप वेब?
त्यासाठी सर्वात अगोदर गुगलवरुन व्हॉट्सॲप वेब डाऊनलोड करावे लागेल. अथवा थेट व्हॉट्सॲप वेबसाईट ओपन करावी लागेल. त्यानंतर फोनवर व्हॉट्सॲपच्या App वर जाऊन सेटिंगमध्ये Linked Devices वर टॅप करावे लागेल. आता Link a device वर जाऊन QR कोड स्कॅन करावा लागेल.