Bank Fraud | हे गुगल करु नका, नाही तर बँक खाते खाली झालेच म्हणून समजा
Bank Fraud | गुगल सर्च करताना सावध रहा. आपण काही माहिती करुन घ्यायची असली सरळ गुगलवर जातो. कोणत्याही गोष्टीची खंडीभर माहिती गुगलवर सहज मिळते. पण गुगलवर सर्च करताना तुम्ही सावज तर होत नाही ना, याची काळजी घ्या. नाही तर तुम्हाला मोठा आर्थिक भूर्दंड बसू शकतो. तुमचे खाते साफ होऊ शकते.
नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : एक साधं गुगल सर्च तुमचं बँक खाते रिकामे करु शकते. तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल. पण देशात अशा अनेक गुन्हे घडले आहे. गुगलवर कोणत्याही गोष्टीची सहज माहिती मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षात गुगलवर सर्च करण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्हेगारांसाठी गुगल हे एक प्रकारचे कुरण आहे. तिथे कोणी ना कोणी त्यांच्या गळाला लागतोच. युझर्सची एक चूक त्यांच्या कमाईचे साधन ठरते. त्यामुळे गुगल सर्च करतना सावध रहा. सर्चिंग करताना तुम्ही सावज होणार नाही, याची काळजी घ्या. या गोष्टी सर्च करताना तर विशेष काळजी घ्या.
- ऑनलाईन पैसा कसा कमवावा – सध्याच्या काळात वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन वर्किंग या माध्यमातून कमाईची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. तिथून अनेक जण घरबसल्या कमाई पण करत आहेत. पण त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच काम करावे लागते. गुगलवर तुम्ही या शब्दांनी सर्च करत असाल तर अडचणीत येऊ शकता. ऑनलाईन कमाईची संधी देण्याचे आमिष दाखवत अनेक सायबर गुन्हेगार फसवणूक करु शकतात. तुमची महत्वाची माहिती चोरुन बँक खाते साफ करु शकतात.
- कस्टमर केअरचा पण फटका- बँका, विमा कंपन्या अथवा इतर अनेक ठिकाणी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण लागलीच गुगलवर जाऊन सर्च करतो. सर्वात अगोदर आपण कस्टमर केअर क्रमांक शोधतो. तांत्रिक मदतीसाठी पण आपण मदत मागतो. सायबर गुन्हेगार बँका, विमा कंपन्यांच्या नावे कस्टमर केअर टाकतात. त्या आधारे ग्राहकांची माहिती घेऊन त्यांना गंडावतात.
- मित्र जोडा- काही जण ऑनलाईन मित्र जोडण्याच्या ऑफर्सला बळी पडतात. महिला, तरुणींसोबत डेटिंग करा, अशा जाहिरातीला बिलकूल भीक घालू नका. नाहीतर तुम्हाला फटका बसल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी तुमची खासगी माहिती जमा करण्यात येते. आता तर व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करुन ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहे. गोड आवाजातील तरुणींच्या आवाजाने सापळ्यात अडकवण्यात येते. त्यानंतर बँक खाते साफ करण्यात येते.
- फ्री क्रेडिट स्कोअर, रिपोर्ट – ही एक फसवणुकीची ट्रिक आहे. या युक्तीत युझर्सला फ्री क्रेडिट स्कोअरचे आमिष दाखविण्यात येते. तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे, तुम्हाला किती कर्ज मिळू शकते. स्वस्तात कर्ज देण्याचे आमिष दाखविण्यात येते. तुमचे CIBIL मोफत तयार करण्याची थाप मारण्यात येते. त्यानंतर तुमच्याकडून तुमची सर्व वैयक्तिक माहिती, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, बँकेची माहिती, खाते क्रमांक अशी माहिती जमा करुन खाते साफ करण्यात येते.
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update