10 हजार रुपयांपर्यंत स्वस्त होतील स्मार्टफोन; बजेटमधील घोषणेनंतर इतका स्वस्त झाला iPhone
Imported Mobile Phone : मोबाईल प्रेमींसाठी बजेटमध्ये मोठा दिलासा मिळाला. आयफोन आणि महागड्या स्मार्टफोनच्या किंमती आता आवाक्यात येणार आहे. आयात करण्यात येणाऱ्या स्मार्टफोनवरचे सीमा शुल्क कमी करण्यात आल्याने खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये आयात स्मार्टफोनवरील सीमा शुल्कात, आयात शुल्कात कपतीचा निर्णय जाहीर केला. शुल्कात 5 टक्के कपात करण्यात आली. त्यामुळे महागड्या स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त होतील. मूळ सीमा शुल्क 20 टक्क्यांहून आता 15 टक्के इतके कमी करण्यात आले आहे. तर शुल्क कपातीमुळे महागडे फोन आयात होतील आणि त्याची खरेदी पण वाढण्याची शक्यता आहे. आयफोन तर भारतात तयार होत आहे. पण काही मॉडेल्स बाहेरुन आयात करण्यात येतात. तर काही मोबाईल कंपन्या अजून ही भारतात दाखल झालेल्या नाहीत, कदाचित या कपातीमुळे त्या उत्पादने देशात आणू शकतील.
आयात स्मार्टफोन स्वस्त
भारतात आयफोनचे प्रो मॉडेल, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro max, गुगलचे अनेक स्मार्टफोन मॉडेल आयात करण्यात येतात. तर काही स्मार्टफोन देशात असेम्बल करण्यात येतात. तर जे स्मार्टफोन पूर्णपणे बाहेर देशात तयार होऊन भारतात आणण्यात येतील. त्यांच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. त्यांची किंमत आता कमी होईल. आतापर्यंत हे बाहेरील स्मार्टफोन महागडे मिळत होते. त्यांच्या किंमती जवळपास 10 हजार रुपयांनी कमी होतील.
इतकी स्वस्त होईल किंमत
समजा iPhone 15 Pro Max चे टॉप मॉडेल 2 लाख रुपयांना मिळतो. या स्मार्टफोनवर भारतात 20 टक्के आयात शुल्क द्यावे लागत होते. त्यामुळे किंमत 40 हजार आयात शुल्क द्यावे लागत होते. आता या शुल्कात 5 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या मॉडेलवर 30 हजार रुपये आयात शुल्क द्यावे लागेल. स्मार्ट खरेदी केल्यास 10 हजार रुपयांचा थेट फायदा होईल.
असा होईल फायदा
जर तुम्ही 2 लाख रुपयांचा आयात केलेला स्मार्टफोन खरेदी करु इच्छित असाल तर तुम्हाला दहा हजारांचा फायदा होईल. ग्राहकाने 1.50 लाख रुपयांचा स्मार्टफोन खरेदी केला तर त्याची 7500 रुपयांची बचत होईल. 1 लाख रुपयांचा स्मार्टफोन खरेदीवर 5000 रुपयांची बचत होईल. ग्राहकाने 50 हजार रुपयांचा स्मार्टफोन खरेदी केला तर त्याला 2500 रुपयांचा फायदा होईल. तर 25 हजार रुपयांचा स्मार्टफोन खरेदीवर ग्राहकांना 1250 रुपयांचा फायदा होईल.