नवी दिल्ली | 3 नोव्हेंबर 2023 : सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. व्हॉट्सपअप, फेसबुक, युट्यूब अशी सध्याची ऑनलाईन विद्यापीठं तयार झाली आहे. हवसे,नवसे, गवसे सर्वांचीच या यात्रेत गर्दी आहे. प्रत्येक जण थोडा वेळ तर या प्लॅटफॉर्मवर फेरफटका मारतोच. युट्यूबवर अनेक जण व्हिडिओ पोस्ट करुन कमाई करत आहेत. पण बरेचदा इतर कोणाचे गाणे, कंटेट, संगीत वापरल्याचा ठपका बसतो. तुमच्या युट्यूब व्हिडिओवर कॉपीराईट स्ट्राईक येतो. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल झाला तरी त्याचा तु्म्हाला फायदा होत नाही. या सोप्या पद्धतीने तुम्ही कॉपीराईट स्ट्राईक हटवू शकता.
का लागतो कॉपी राइट
असे हटवा कॉपीराईट स्ट्राईक
कॉपीराईट स्ट्राईक हटविण्यासाठी केवळ एकच पर्याय आहे. तुम्ही तो व्हिडिओ डिलिट करा. अथवा युट्यूबला यथोचित मुद्यांसह तुमची बाजू मांडणारा व्हिडिओ पोस्ट करा. त्यात तुम्हाला हा कंटेट कॉपीराईट फ्री असल्याचा मुद्दा पटवून द्यावा लागेल. तुम्ही कॉपीराईट मुद्याकडे दुर्लक्ष केले तर युट्यूब व्हिडिओ अथवा अकाऊंट पण बंद करु शकते.
व्हिडिओ डिलिट करण्यापूर्वी तुमचा व्हिडिओ कॉपीराईट फ्री असल्याचे व्हेरिफाय करा. त्यानंतर स्ट्राईक स्वीकारा. Copyright School मध्ये सहभाग नोंदवा. याठिकाणी तुम्ही कॉपीराईट मालकाशी संपर्क साधू शकता. तुमचे चॅनल YouTube Partner Program मध्ये सहभागी असेल तर तुम्हाला युट्यूब 7 दिवसांचा वेळ देते. चॅनलविरोदात कॉपीराईट उल्लंघनासाठी तीन स्ट्राईक मिळते. त्यासाठी सात दिवसांचा वेळ देण्यात येतो. या काळात व्हिडिओ हटवावा लागतो वा तो भाग काढून टाकावा लागतो. नाहीतर तुमचे चॅनल बंद करण्यात येते.