Semiconductor : ‘इंडियन चिप’वर चालणार जगभरातील स्मार्टफोन! मेक इन इंडियाचा नारा, पहिला सेमीकंडक्टर प्लँट या शहरात

Semiconductor : सेमीकंडक्टरच्या तुटवड्यावर भारताने आता रामबाण उपाय दिला आहे. तैवान, चीनवर भारत लवकरच कुरघोडी करणार आहे. लवकरच जगभरातील स्मार्टफोन इंडियन चिपवर चालतील.

Semiconductor : 'इंडियन चिप'वर चालणार जगभरातील स्मार्टफोन! मेक इन इंडियाचा नारा, पहिला सेमीकंडक्टर प्लँट या शहरात
मेक इन इंडिया
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 9:24 AM

नवी दिल्ली : कोरोनाने जगभरातील बाजारापेठांना मोठा धक्का दिला. जगभरातील उद्योगांवर कोरोनाचे सावट पसरले. त्यात सेमीकंडक्टरचा तुटवडा (Semiconductor Crisis) ही मोठी समस्या जगाला भेडसावली. आजही समस्या सोडविण्यात यश आलेले नाही. स्मार्टफोनपासून वाहन उद्योगांमध्ये सेमीकंडक्टर हा उत्पादनाचा महत्वाचा भाग आहे. परंतु चीन, तैवान आणि दक्षिण कोरिया येथील उत्पादन घटल्याचा फटका जगाला बसला. त्यानंतर सेमीकंडक्टर उत्पादनासाठी पर्यायी बाजारपेठेचा शोध सुरु झाला. त्यात मोदी सरकारने उद्योजकांना पायघड्या अंथरल्या. आता भारतात सेमीकंडक्टरचे मोठे उत्पादन होणार आहे. गुजरात राज्यात देशातील पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प लवकरच सुरु होत आहे. जगभरातील स्मार्टफोन, टिव्ही, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आणि वाहनांमध्ये आता मेक इन इंडियाचा नारा घुमेल.भारतात तयार होणाऱ्या सेमीकंडक्टरचा (Chip) सर्वत्र वापर होईल.

उद्योजक अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह (Vedanta Group) आणि सेमीकंडक्टर सेक्टरमधील सर्वात मोठी उत्पादक कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) हे संयुक्तपणे हा प्रकल्प उभारत आहेत. गुजरात राज्यातील धोलेरा येथील विशेष आर्थिक क्षेत्रात (Special Investment Zone) हा प्रकल्प सुरु होत आहे. अहमदाबादजवळ हा प्रकल्प आकार घेत आहे.

तैवान येथील फॉक्सकॉनसोबत भारतीय वेदांता ग्रुपने सप्टेंबर 2022 मध्ये करार केला. या कंपन्या गुजरातमधील अहमदाबाद जवळ चिप, सेमीकंडक्टरचे उत्पादन सुरु करणार आहेत. या प्रकल्पासाठी 1.54 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या संयुक्त प्रकल्पात वेदांता समुहाचा 60 टक्के वाटा असेल. तर फॉक्सकॉन 40 टक्के भागीदार असेल.

हे सुद्धा वाचा

या प्रकल्पात सेमीकंडक्टर, डिस्प्ले ग्लास तयार करण्यात येतील. या प्रकल्पामुळे ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात आवश्यक चिपचे उत्पादन करण्यात येईल. देशाच्या उद्योग जगतातील ही आतापर्यंतची सर्वात मोठा कॉर्पोरेट गुंतवणूक ठरली आहे. या प्रकल्पात सेमीकंडक्टरच नाही तर डिस्प्लेचेही उत्पादन होणार आहे.

वेदांता आणि फॉक्सकॉन यांच्यामध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प स्थापन्याच्या हालचाली बऱ्याच दिवसांपूर्वी सुरु झाल्या होत्या. पण हा प्रकल्प कुठे सुरु करावा याविषयी ठरलेले नव्हते. हा प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगाव दाभाडे जवळ होणार होता. यापूर्वीच्या राज्य सरकारसोबत त्याविषयीचा सोपास्कार झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण कंपनीने अचानक गुजरात राज्याकडे मोर्चा वळविल्याने सध्याचे राज्य सरकार केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केला होता.

चिप आणि डिस्प्ले उत्पादनात सध्या तैवान, चीन-हाँगकाँग, दक्षिण कोरिया यांचा दबदबा आहे. एकट्या तैवानचा सेमीकंडक्टर उत्पादनात 92 टक्के वाटा आहे. आता भारतात सेमीकंडक्टर आणि चिपचे उत्पादन सुरु होणार आहे. त्यामुळे या देशातील बाजारपेठेला धक्का बसणार आहे.

एका रिपोर्टनुसार, 2026 पर्यंत भारत सेमीकंडक्टर आणि चिपची 17 टक्के गरज देशातूनच पूर्ण करेल. त्यामुळे आयातीवरचा खर्च कमी होईल. इंडिया सेमीकंडक्टर मार्केट रिपोर्ट 2019-2026 नुसार, भारतात 300 अरब डॉलरची बाजारपेठ उभी राहील. इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील चीनी कंपन्यांच्या वर्चस्वाला धक्का बसेल. त्यामुळे येत्या 5 वर्षातच त्यांना भारताशी स्पर्धा करावी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.