भारतीय कंपनी जीवीचे 3 नवे स्मार्टफोन लाँच, किंमत तब्बल…
मुंबई : स्मार्टफोन बनवणाऱ्या भारतीय कंपनी जीवी मोबाईलने तीन नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. एक्सट्रीम 3, एक्सट्रीम 3 एक्स आणि एक्सट्रीम 7 हे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. हे तिनही स्मार्टफोन सामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. यांची किंमत 4,499 ते 5,999 पर्यंत आहे. या तीन स्मार्टफोनपैकी एस्कट्रीम 3 आणि एक्सट्रीम एक्सची किंमत 4,999 रुपये इतकी […]
मुंबई : स्मार्टफोन बनवणाऱ्या भारतीय कंपनी जीवी मोबाईलने तीन नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. एक्सट्रीम 3, एक्सट्रीम 3 एक्स आणि एक्सट्रीम 7 हे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. हे तिनही स्मार्टफोन सामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. यांची किंमत 4,499 ते 5,999 पर्यंत आहे.
या तीन स्मार्टफोनपैकी एस्कट्रीम 3 आणि एक्सट्रीम एक्सची किंमत 4,999 रुपये इतकी आहे. तर एक्सट्रीम 7 ची किंमत 5,999 रुपये आहे. हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी कंपनीने ग्राहकांना झीरो डाऊन पेमेंटचं ऑप्शनही दिलं आहे. हे स्मार्टफोन तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदी करु शकता.
“हे नवे स्मार्टफोनमध्ये अपग्रेडेड आहेत. आम्ही कमी किमतीचे नव्या सिरीजचे लो बजेट स्मार्टफोन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही हे सर्व स्मार्टफोन ग्राहकांच्या गरजेनुसार कमी किमतीत डिझाईन केले आहेत”, असे जीवी मोबाईल कंपनीचे मार्केटिंग हेड हर्षवर्धन यांनी सांगितले.
Xtreme 3 चे फीचर्स
जीवी मोबाईल Xtreme 3 मध्ये 5.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 1.3 गीगाहर्ट्जचं क्वॉड कोअर प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 8 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. यामध्ये 8 एमपीची रिअर कॅमेरा तर 5 एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 3,000 mAh ची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 8.1 ओरिओ (Go edition)काम करतो.
Xtreme 3X चे फीचर्स
Xtreme 3X मध्ये 5.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 1.3 गीगाहर्ट्जचं क्वॉड कोअर प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. यामध्ये 8 एमपीची रिअर कॅमेरा तर 5 एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 3,000 mAh ची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 8.1 ओरिओ (Go edition)वर काम करतो.