वर्षभरात तब्बल 4 कोटी फोनची विक्री, नंबर वन पटकावत Xiaomi चा दबदबा, टॉप 5 कंपन्या कोणत्या?

शाओमी हा ब्रँड स्मार्टफोनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. (Indian Smartphone Market top 5 selling Phones)

वर्षभरात तब्बल 4 कोटी फोनची विक्री, नंबर वन पटकावत Xiaomi चा दबदबा, टॉप 5 कंपन्या कोणत्या?
Xiaomi स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 11:34 PM

मुंबई : कोरोना काळात स्मार्टफोनच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. मात्र शाओमी (Xiaomi) या स्मार्टफोन कंपनीचा मार्केटमध्ये अद्याप दबदबा कायम आहे. शाओमी या कंपनीने गेल्या वर्षभरात भारतात 4.1 कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे. गेल्या वर्षी भारतीय बाजारात शाओमीची भागीदारी ही 27 टक्के इतकी होती. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या भागीदारीत 6 टक्क्यांनी घट झाली आहे. पण तरीही शाओमी या ब्रँडला भारतीय स्मार्टफोनला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे शाओमी हा ब्रँड स्मार्टफोनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, IDC च्या एका अहवालात याबाबतची माहिती समोर आली आहे. (Indian Smartphone Market top 5 selling Phones)

गेल्यावर्षी कोरोना काळात सर्वच व्यापारी, तसेच मोठमोठ्या कंपन्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोना काळात मंदी असतानाही गेल्यावर्षी भारतात 15 कोटीहून अधिक स्मार्टफोनची विक्री झाली आहे. शाओमीच्या या जबरदस्त यशामागे रेडमी 8 आणि रेडमी 9 या दोन स्मार्टफोन सीरिजचा फार मोठा सहभाग आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सीरिजनंतर आता Redmi Note 10 सीरिज बाजारात आणणार आहे.

सॅमसंगकडून 2.97 कोटी स्मार्टफोनची विक्री 

तर दुसरीकडे IDC च्या अहवालानुसार, दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग हा स्मार्टफोन ब्रँड आहे. 2019 च्या तुलनेत यंदा सॅमसंगच्या विक्रीत 4 टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान गेल्यावर्षी सॅमसंगने 2.97 कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे. त्यामुळे सॅमसंगने 20 टक्के भागीदारी मिळवली आहे.

सॅमसंगच्या Galaxy M आणि Galaxy F सीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2019 च्या तुलनेत सॅमसंगच्या स्मार्टफोनची ऑनलाईन सेल 65 टक्क्यांनी वाढली आहे.

वीवोकडून 2.67 कोटी स्मार्टफोनची विक्री 

तर या अहवालात चायनीज कंपनी वीवो (Vivo) ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी वीवो कंपनीची स्मार्टफोनच्या विक्रीत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी 2020 मध्ये वीवोने एकूण 2.67 कोटी स्मार्टफोनची विक्री करण्यात आली आहे. वीवोची बाजारात 18 टक्के भागीदारी आहे.

तसेच गेल्यावर्षी भारतीय स्मार्टफोन बाजारात रिअलमी (Realme) चौथ्या क्रमांकावर आहे. रिअलमीने गेल्यावर्षी 1.92 कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे. रिअलमीचा बाजारातील हिस्सा 13 टक्के आहे. त्याचबरोबर ओप्पो (Oppo) पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षात ओप्पोने 1.65 कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे. गेल्यावर्षी भारतीय बाजारात ओप्पोचा बाजारात हिस्सा 11 टक्के इतका होता. (Indian Smartphone Market top 5  selling Phones)

संबंधित बातम्या : 

6.5 इंच HD+ डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, Moto चा दमदार स्मार्टफोन येणार, किंमत 10 हजारांहून कमी

128GB स्टोरेज, तगडा बॅटरी बॅकअप, ‘हा’ स्मार्टफोन किफायतशीर दरात मिळणार

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.