WhatsApp युजर्सचा डेटा सुरक्षित नाही, सायबर एक्सपर्ट्सचा इशारा

| Updated on: Apr 17, 2021 | 11:50 PM

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा डेटा लीक होण्याचा धोका वाढला आहे. सायबर सिक्युरिटी एजन्सी सीईआरटी-इनने अ‍ॅपमधील असुरक्षितता सादर केल्या आहेत.

WhatsApp युजर्सचा डेटा सुरक्षित नाही, सायबर एक्सपर्ट्सचा इशारा
व्हॉटसअ‍ॅप
Follow us on

मुंबई : नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या व्हॉट्सअ‍ॅप समोरच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅपवरील युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक होण्याचा धोका वाढला आहे. देशातील सायबर सिक्युरिटी एजन्सी सीईआरटी-इनने इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमधील काही असुरक्षितता सर्वांसमोर सादर केल्या आहेत. एजन्सीने युजर्सना अशी चेतावणी दिली आहे की, युजर्सची संवेदनशील माहिती लीक होऊ शकते. (India’s Cyber Agency Issues Security Warning For WhatsApp Threats)

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-India) द्वारे जाहीर करण्यात आलेल्या “अत्यंत गंभीर” श्रेणीतील सल्ल्यामध्ये म्हटलं आहे की, अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसचं व्हर्जन 2.21.4.18 च्या अगोदरचे व्हर्जन आणि आयओएससाठी व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसच्या v2.21.32 व्हर्जनच्या अगोदरचे सॉफ्टवेअरमधील कमकुवतपणा उघड झाला आहे. CERT-India सायबर अटॅकचा मुकाबला करणे आणि भारतीय सायबर स्पेसला संरक्षण प्रदान करणारी टेक्नोलटजी टीम आहे.

हॅकर्सकडे व्हॉट्सअ‍ॅप डेटाचा अ‍ॅक्सेस

सीईआरटी-इंडिया ही देशातील सायबर हल्ल्यापासून बचावासाठी आणि भारताच्या सायबर स्पेसच्या संरक्षणाची जबाबदारी निभावणारी तांत्रिक शाखा आहे. “व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशनमध्ये अनेक असुरक्षितता आहेत, ज्यामुळे हॅकर / हल्लेखोर स्वतःच्या मर्जीने कोड लिहून त्याचा वापर करु शकतात. तसेच कोणत्याही सिस्टिम/कॉम्प्यूटरमधील संवेदनशील डेटा हॅक करु शकतात.

धोका टाळण्यासाठी काय करायला हवं?

धोक्याचे तपशीलवार वर्णन करताना CERT-India ने म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅपमधील या असुरक्षित कॅशे कॉन्फिगरेशनच्या समस्या आणि ऑडिओ डिकोडिंगच्या पद्धतीतील त्रुटी या सर्व अडचणींमागील प्रमुख कारण आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, युजर्सनी Google Play Store किंवा iOS Store वरून त्वरित त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करायला हवं, जेणेकरून या असुरक्षा दूर होऊ शकतील आणि कोणताही निकटचा धोका टाळता येईल.

कारणं अस्पष्ट

काही युजर्सनी व्हॉट्सअ‍ॅपवर अनपेक्षितपणे बॅन झाल्याची नोंद केली आहे. युजर्सनी नोंदवले आहे की, त्यांनी अ‍ॅप सुरु करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचं अकाऊंट अनेकदा लॉगआऊट झालं. हे नेमकं कशामुळे होतंय? यामागील कारणं काय? हे अद्याप उघड झालेलं नाही. तथापि, ज्या युजर्सना असे वाटत असेल की त्यांना कंपनीने अन्यायकारकपणे बॅन केलंय, ते कंपनीला मेल पाठवून त्यांची तक्रार मांडू शकतात.

इतर बातम्या

आयसीआयसीआय बँकेत खाते आहे आणि एटीएममधून पैसे काढता? तर जाणून घ्या हे अपडेट

खुशखबर! Jio कडून मोफत 10GB डेटासह IPL सामने पाहण्याची संधी, जाणून घ्या काय आहे ऑफर

जोडीदार शोधताय? नवा डेटिंग अ‍ॅप, चॅट ऐवजी थेट व्हिडीओ कॉल करा, मनातलं सगळं मळभ बाहेर काढा

(India’s Cyber Agency Issues Security Warning For WhatsApp Threats)