स्मार्टफोनच्या दुनियेतील ‘ही’ अग्रेसर कंपनी आता भारतात लाँच करणार टीव्ही आणि साऊंडबार

इंफिनिक्स कंपनीकडून लाँच करण्यात येणारे टीव्ही 32 इंच आणि 43 इंच इतक्या आकाराचे असतील. | two android smart tvs

स्मार्टफोनच्या दुनियेतील 'ही' अग्रेसर कंपनी आता भारतात लाँच करणार टीव्ही आणि साऊंडबार
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 1:15 PM

मुंबई: स्मार्टफोन बनवणारी हाँगकाँगमधील इंफिनिक्स ही कंपनी आता लवकरच भारतातील टीव्ही संच निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. काही दिवसांपूर्वीच इंफिनिक्सकडून फ्लिपकार्टवर X1 या नावाने टीव्ही लिस्ट केला होता. त्यामुळे आता लवकरच भारतीय बाजारपेठेत इंफिनिक्सचा टीव्ही पाहायला मिळू शकतो. (infinix set to launch two android smart tvs )

इंफिनिक्स कंपनीकडून लाँच करण्यात येणारे टीव्ही 32 इंच आणि 43 इंच इतक्या आकाराचे असतील. याशिवाय, कंपनीकडून साउंडबारही बाजारपेठेत आणले जाणार आहेत.

यापूर्वी इंफिनिक्सचा X1 हा टीव्ही केनियात लाँच करण्यात आला होता. हा टीव्ही फ्रेमलेस असून त्यामध्ये अ‍ॅड्रॉईड 9.0 आणि डॉल्बी यासारखी फिचर्स असतील. याशिवाय, या टीव्हीत 64 बिट प्रोसेसर आणि 1 ते 8 जीबीची रॅम असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना या टीव्हीवर यूट्यूब, नेटफ्लिक्स और प्राइम वीडियो या अ‍ॅप्सवरील चित्रपट आणि वेबसिरीजही पाहता येतील.

इंफिनिक्सच्या प्रवेशामुळे भारतीय बाजारपेठेत स्पर्धा वाढणार

इंफिनिक्सने टीव्ही संच निर्मितीच्या बाजारपेठेत प्रवेश केल्यामुळे भारतात मी टीव्ही, रियलमी टीव्ही, Vu, टीसीएल यासारख्या ब्रँडसना स्पर्धा निर्माण होणार आहे. इंफिनिक्सने याबद्दल माहिती देताना सांगितले की, आम्ही टीव्हीसोबत साऊंडबारही लाँच करणार आहोत. यापूर्वीही इंफिनिक्सने भारतीय बाजारपेठेत ऑडिओ प्रॉडक्टस लाँच केली आहेत.

इंफिनिक्सचा Zero 8i स्मार्टफोन बाजारपेठेत

इंफिनिक्सने गुरुवारी भारतात Zero 8i स्मार्टफोन लाँच केला. या स्मार्टफोनची किंमत 14,999 इतकी आहे. या स्मार्टफोनचे अनोखे डिझाईन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Zero 8i स्मार्टफोन हा 6.85 इंचांचा असून यामध्ये FHD+ डुअल पिन होल डिस्प्लेची सुविधा आहे. या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. तसेच यामध्ये मीडियाटेक हीलियो G90T 64 बिट ऑक्टा कोर प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम आहे.

या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये क्वाड कॅमेरा सेटअपची सुविधा आहे. तसेच 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेंसर, दोन मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि एका आय सेंसरचा समावेश आहे. तर स्मार्टफोनमध्ये 16 आणि 8 मेगापिक्सलचे फ्रंट कॅमेरे उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनची बॅटरी 4500mAh इतकी आहे.

संबंधित बातम्या:

नवीन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरसह Realme, Oppo आणि Xiaomi चे स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर

256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर

(infinix set to launch two android smart tvs )

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.