7,199 रुपयांचा स्मार्टफोन अवघ्या 599 रुपयात, कंपनीकडून ऑफर्सचा धमाका

हा फोन फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. (Infinix Smart 5 first sale on Flipkart)

7,199 रुपयांचा स्मार्टफोन अवघ्या 599 रुपयात, कंपनीकडून ऑफर्सचा धमाका
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 10:36 AM

मुंबई : इन्फिनिक्स या कंपनीने त्यांचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Infinix Smart 5 चा पहिला सेल आज आयोजित केला आहे. हा फोन फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनची किंमत केवळ 7,199 रुपये इतकी आहे. पहिल्या सेलमध्ये या स्मार्टफोनवर कंपनीने डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफर्स दिल्या आहेत. या एंट्री लेव्हल फोनमध्ये इतर स्मार्टफोनप्रमाणे सुरुवातीचे (किंवा कॉमन) सर्व फीचर्स उपलब्ध आहेत. (Infinix Smart 5 first sale in India price Rs 7199, get discount and cashback offers)

Infinix Smart 5 हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही येस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरु शकता. या क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही EMI वर हा फोन खरेदी केला तर तुम्हाला 7 टक्क्यांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळेल. त्याशिवाय तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे (Flipkart Axis Bank Credit Card) पेमेंट कराल तर तुम्हाला 5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. सोबतच ग्राहक या फोनवर एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकतात. यामध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त 6,600 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळेल. म्हणजेच हा फोन ग्राहक अवघ्या 599 रुपयांमध्येदेखील खरेदी करु शकतात.

फोनमधील फीचर्स

फोनमध्ये 6.82 इंचांचा HD+ डिस्प्ले दिला जाईल, जो नॉच सेल्फी कॅमेरासह येतो. या फोनचं भारतीय वेरिएंट थोडं वेगळं असू शकतं. या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. या फोनच्या ग्लोबल वेरिएंटबाबत बोलायचे झाल्यास हा फोन अँड्रॉयड 10 गो एडिशनवर बेस्ड असेल, जो XOS 6 सह येतो.

या फोनच्या ग्लोबल वेरिएंटमध्ये युजर्सना 6.6 इंचांचा 720×1,600 पिक्सल्सचा आयपीएस डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 1.8GHz चा प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 3 जीबी रॅमसह येतो. या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास या फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, तर दोन QVGA सेंसर्सही देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

इन्फिनिक्स स्मार्ट 5 हा स्मार्टफोन 64 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस तुम्ही मायक्रो एसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवू शकता. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये वायफाय, 4 जी, जीपीएस, ब्लुटूथ, 3.5mm चा हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

Infinix च्या या फोन्सना ग्राहकांची पसंती

Infinix Smart 4: किंमत 6,999 रुपये : इनफिनिक्स स्मार्ट 4 हा मोबाईल सध्या चांगला ट्रेंडमध्ये आहे. या फोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. या फोनमध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन फक्त 6 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.

इन्फिनिक्स स्मार्ट HD (Infinix Smart HD 2021) : इन्फिनिक्स स्मार्ट HD हा स्मार्टफोन भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन युजर्स फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकतात. इन्फिनिक्स स्मार्ट HD मध्ये 6.1 इंचांचा HD+ ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर असे सांगण्यात आले आहे की, या फोनला मागच्या बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आहे. स्मार्टफोनमध्ये 1.2GHz चा चिपसेट दिला जात आहे. जो 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेजसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबतच 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही (सेल्फी कॅमेरा) मिळेल.

हेही वाचा

Vivo भारतीय मार्केटमध्ये धमाका करणार, एप्रिलपर्यंत 11 नवे स्मार्टफोन्स बाजारात दाखल होणार

प्रतीक्षा संपली! Redmi Note 10 च्या लाँचिंगचं काऊंटडाऊन सुरु

आऊट ऑफ स्टॉक झालेला POCO चा दमदार स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यास परतला

(Infinix Smart 5 first sale in India price Rs 7199, get discount and cashback offers)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.