कमी पैशांत धमकेदार फीचर, एका बजेट स्मार्टफोनकडून अजून काय पाहिजे

Infinix Smart 8 HD | बजेट स्मार्टफोनमध्ये इनफिनिक्सने फीचर्सचा पाऊस पाडला आहे. अनेक फीचर्ससह दमदार बॅटरीने या फोनकडे युझर्सचे लक्ष वेधले आहे. Infinix Smart 8 HD स्मार्टफोन बाजारात आला आहे. किंमत कमी असली तरी हा डिव्हाईस त्याच्या जबरदस्त फीचरमुळे चर्चेत आला आहे. जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत, विक्रीची तारीख आणि त्याचे खास फीचर

कमी पैशांत धमकेदार फीचर, एका बजेट स्मार्टफोनकडून अजून काय पाहिजे
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 3:40 PM

नवी दिल्ली | 8 डिसेंबर 2023 : हँडसेट निर्माता कंपनी Infinix ने भारतीय बाजारात ग्राहकांसाठी खास बजेट स्मार्टफोन दाखल केला आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत आणि त्यांच्या खिशाचा विचार करत हा स्मार्टफोन बाजारात उतरविण्यात आला आहे. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये फीचर्सची रेलचेल आहे. हा बजेट स्मार्टफोन ग्राहकांना महागड्या iPhone चा फील दिल्याशिवाय राहणार नाही. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Apple Dynamic Island सारखे फीचर दिले आहे. त्याला मॅजिक रिंग असे नाव देण्यात आले आहे. जाणून घ्या Infinix Smart 8 HD ची किंमत, विक्रीची तारीख, ऑफर्स आणि स्मार्टफोनमध्ये दिलेल्या विविध फीचर्सविषयी…

Infinix Smart 8 HD ची किंमत काय

या ताज्या दमाच्या इनफिनिक्स स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज मिळते. या व्हेरिएंटची किंमत 6299 रुपये आहे. सध्या कंपनी हा स्मार्टफोन 5699 रुपयांना विक्री करणार आहे. या डिव्हाईसमध्ये शायनी गोल्ड, क्रिस्टल ग्रीन, गॅलेक्सी व्हाईट आणि टिंबर ब्लॅक रंगाचा समावेश आहे. कंपनीने अजून एक ऑफर ठेवली आहे. त्यानुसार, हा फोन खरेदी करताना तुम्ही एक्सिस बँकेच्या कार्डचा वापर केला तर अजून 10 टक्के डिस्काऊंट मिळेल. या स्मार्टफोनची विक्री 13 डिसेंबरपासून Flipkart वर सुरु होत आहे.

हे सुद्धा वाचा

Infinix Smart 8 HD चे फीचर्स काय

  • 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह या फोनमध्ये 6.6 इंचचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. त्याला 180 हर्ट्ज टच सॅपलिंग रेट सपोर्ट मिळतो. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी या डिव्हाईसमद्ये युनिसॉक टी606 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली जी57 जीपीयूचा वापर करण्यात आला आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोअरेज आहे. मायक्रो एसडी कार्डसह स्टोअर 2 टीबीपर्यंत वाढविता येईल. कॅमेरा सेटअप पण जोरदार आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह एआय कॅमेरा सेंसर देण्यात आले आहे. फोनच्या फ्रंटसाईडला 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.
  • Infinix Smart 8 HD मध्ये 10 वॉट चार्ज सपोर्ट सह 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सुरक्षेसाठी या फोनच्या पॉवर बटनमध्येच फिंगरप्रिंट सेन्सरचे इंटीग्रेट देण्यात आले आहे. अन्य फीचर्समध्ये ग्राहकांना 4जी सपोर्ट, 3 जीबी रॅम सपोर्ट, डीटीएस प्रोसेसिंग, फोटो कम्प्रेसर, एआय गॅलरी, जेस्चर सपोर्ट आणि डीटीएस साऊंड मिळतो.
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.