Instagram Outage : इंस्टाग्रामचे सर्व्हर डाऊन, देशातील अनेक भागात सेवा ठप्प
जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अॅप इंस्टाग्रामचे सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे इस्टाग्रामचे अॅप सुरू करण्यास समस्या जाणवत असल्याची माहिती काही यूजर्सनी ट्विट करत दिली.
मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया (Social media)अॅप असलेल्या इंस्टाग्रामचे (Instagram) सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक युजर्सना इंस्टाग्रामवर लॉगइन करण्यासंदर्भात समस्या जाणवत आहेत. यातील काही युजर्सकडून ट्विट करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. इंस्टाग्राम लॉगइन करू शकत नसल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तर काही युजर्सने असे देखील सांगितले की, आम्हाला इंस्टाग्राम रिफ्रेश करताना समस्या जाणवत आहेत. आम्ही इंस्टाग्राम रिफ्रेश करू शकत नाहीत. डाऊन डिटेक्टर (DownDetector) या साईटकडून देखील ही बातमी कन्फर्म करण्यात आली आहे. या साईटकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 मे रोजी म्हणजे आज सकाळी 9 वाजून 45 मिनिटांपासून ते जवळपास दुपारी 12 वाजून 45 मिनिटांपर्यंत इंस्टाग्रामचे सर्व्हर डाऊन होते.
अनेक शहरात सेवा ठप्प
डाऊन डिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार भारतात दिल्ली, जयपूर, लखनऊ, मुंबई, बेंगळुरू आणि अन्य काही शहरांमध्ये इंस्टाग्राम अॅप लॉगईन करण्यासाठी किंवा त्यावर पोस्ट अपडेट करण्यासाठी, शेअर्स करण्यासाठी समस्या येत होती. मात्र सर्वच युजर्सना ही समस्या जाणवली नाही तर काही लोकांना याबाबत समस्या आल्याचे देखील डाऊन डिटेक्टरने म्हटले आहे. काही लोकांना लॉगईनची समस्या होती, तर काही जणांना इंस्टाग्रामच्या रिफ्रेश संदर्भात समस्या जाणवली.
यापूर्वी देखील सर्व्हर झाले होते डाऊन
इंस्टाग्रामचे सर्व्हर डाऊन होण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वी देखील इंस्टाग्रामचे सर्व्हर डाऊन झाले होते. गेल्या महिन्यात 19 एप्रिल मंगळवारी रोजी देखील इंस्टाग्रामचे सर्व्हर डाऊन झाले होते. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे युजर्सला अनेक तास इंस्टाग्राम लॉगईन करण्याबाबत समस्या जाणावली. याबाबत देखील तेव्हा युजर्सकडून ट्विटरवर माहिती देण्यात आली होती. मात्र तेव्हा देखील सरसकट युजर्सला ही समस्या जाणवली नव्हती. मात्र सर्व्हर डाऊन झाल्याबाबत अद्याप इंस्टाची कंपनी मेटा कडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मेटा ही फेसबूक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामची पॅरंटस कंपनी आहे.