3D अवतार, स्क्रीन शेअरिंगसह भन्नाट फीचर्स, Instagram वापरणं अधिक मजेदार होणार, पाहा नवीन फीचर्सची यादी

फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) युजर्सचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी 2022 मध्ये नवीन फीचर्स (Instagram New Features) सादर करण्याची तयारी करत आहे. गेल्या वर्षभरात इंस्टाग्राम हे भारतात सर्वाधिक डाउनलोड झाले आहे.

3D अवतार, स्क्रीन शेअरिंगसह भन्नाट फीचर्स, Instagram वापरणं अधिक मजेदार होणार, पाहा नवीन फीचर्सची यादी
Instagram
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 5:38 PM

मुंबई : फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) युजर्सचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी 2022 मध्ये नवीन फीचर्स (Instagram New Features) सादर करण्याची तयारी करत आहे. गेल्या वर्षभरात इंस्टाग्राम हे भारतात सर्वाधिक डाउनलोड झाले आहे. यासोबतच आता अॅपचा वाढता यूजरबेस पाहता सेवा सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. Instagram च्या नवीन फीचर्सच्या यादीत व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअरिंग (Screem Sharing), नवीन प्रोफाइल बॅनर, 3D अवतार, क्रिएटर्ससाठी पेड सब्सक्रिप्शन, रिल्ससाठी टाइम लिमिट यांसारख्या नवीन अपडेट्सचा समावेश आहे. कालांतराने, कंपनी सर्व युजर्ससाठी हे फीचर्स अपडेट करेल.

Instagram एका नवीन फीड पर्यायाची चाचणी करत आहे जे युजर्सना त्यांच्या होम फीडमध्ये पाहू इच्छित असलेल्या पोस्टवर अधिक कंट्रोल देईल. फीचर्सचा एक भाग म्हणून, Instagram दोन पर्याय ऑफर करेल – ‘फॉलोइंग’ आणि ‘फेवरेट्स’. Favourites हा पर्याय युजर्स फॉलो करत असलेल्या अकाऊंटवरील सर्व पोस्ट दर्शवेल.

स्क्रीन शेअरिंग : चालू व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअरिंगचा पर्याय मिळेल. इन्स्टाग्राम सध्या व्हिडिओ कॉलवरील स्क्रीन शेअरिंग फीचर टेस्ट करत आहे. इन्स्टाग्राम हे फीचर कधी आणि कसे लागू करणार आहे याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.

नवीन प्रोफाइल बॅनर : Instagram ने अलीकडेच युजर्ससाठी एक नवीन प्रोफाइल बॅनर जाहीर केलं आहे ज्याच्या अंतर्गत ते युजर्सना त्यांचे शेड्यूल केलेले लाइव इव्हेंट त्यांच्या प्रोफाइलवर शेअर करण्यास परवानगी देईल आणि त्यांना स्टोरीजद्वारे अपडेटेड लाइव्ह इव्हेंट शेअर करण्याचा पर्याय देईल.

स्टोरी साठी 3D अवतार : Instagram ने अलीकडे Instagram स्टोरी साठी Apple Memoji सारख्या 3D अवताराची घोषणा केली आहे. नावाप्रमाणेच, हे फीचर युजर्सना त्यांचे स्वतःचे 3D अवतार तयार करण्यास आणि आणि GIF तयार करण्यासाठी सक्षम बनवेल. हे फीचर सध्या रोलआउट टप्प्यात आहे.

प्रोफाइल एम्बेड : प्रोफाईल एम्बेड हे एक नवीन फीचर आहे ज्याची चाचणी इंस्टाग्रामने नुकतीच यूएस मध्ये सुरू केली आहे आणि लवकरच इतर देशांमध्ये रोल आउट होण्याची अपेक्षा आहे. प्रोफाइल एम्बेडिंग युजर्सना पोस्ट एम्बेड प्रमाणेच थर्ड पार्टी वेबसाइटवर युजरची संपूर्ण Instagram प्रोफाइल एम्बेड करण्याची अनुमती देते.

क्रिएटर्ससाठी पेड सब्सक्रिप्शन : Instagram ने अलीकडेच यूएसमध्ये पेड सब्सक्रिप्शनची चाचणी सुरू केली आहे. युजर्स एक्सलूसिव कंटेंट आणि स्टोरीसाठी त्यांच्या आवडत्या क्रिएटर्सचे सब्सक्रिप्शन घेण्यास सक्षम असतील. या फीचरची सध्या यूएस मधील काही कंटेंट क्रिएटर्ससह टेस्टिंग केली जात आहे आणि लवकरच इतर देशांमध्ये देखील लाँच केली जाऊ शकते.

90 सेकंद रील्स : इंस्टाग्राम त्याच्या रील्ससाठी 90 सेकंदाच्या व्हिडिओ टाइम लिमिटची चाचणी करत आहे. कंपनी सध्या रिल्ससाठी 15 सेकंद, 30 सेकंद आणि 60 सेकंदांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा पर्याय देते.

इतर बातम्या

पती आणि मुलीच्या फोटोपासून ते प्रभूकुंजच्या पत्त्यांपर्यंत, लतादीदींच्या निधनानंतर नेटिझन्स गुगलवर काय-काय सर्च करतायत?

सावधान! चुकूनसुद्धा डाउनलोड करू नका अशाप्रकारचे ॲप्स, अन्यथा लागेल लाखो रुपयांचा चुणा !

सोशल मीडियावर Reels हिरोंचा डंका, मनोरंजनासोबत पैसे कमावण्याचा काय आहे फंडा? जाणून घ्या!

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.