Iphone 12 vs Iphone 13 : फक्त किंमत आणि कॅमेराच नव्हे तर आणखी बरेच फरक, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट मॉडेल कोणतं?

अ‍ॅपलच्या आयफोनची जगभरात मोठी क्रेझ आहे. दर वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एक नवीन आयफोन लाँच करण्याचा अ‍ॅपल कंपनीचा प्रयत्न असतो. दोन महिन्यांपूर्वी जागतिक बाजारात लाँच झालेल्या आयफोन 13 ला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.

Iphone 12 vs Iphone 13 : फक्त किंमत आणि कॅमेराच नव्हे तर आणखी बरेच फरक, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट मॉडेल कोणतं?
IPhone
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 2:24 PM

मुंबई : अ‍ॅपलच्या आयफोनची जगभरात मोठी क्रेझ आहे. दर वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एक नवीन आयफोन लाँच करण्याचा अ‍ॅपल कंपनीचा प्रयत्न असतो. दोन महिन्यांपूर्वी जागतिक बाजारात लाँच झालेल्या आयफोन 13 ला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. अ‍ॅपलचं हे डिव्हाईस आधीच्या आयफोन 12 चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. याच्या कॅमेरा पोझिशनमध्ये केलेल्या बदलामुळे नवीन आयफोन काही प्रमाणात ट्रोल झाला खरा, मात्र ज्या गोष्टी आयफोन 12 मध्ये नव्हत्या त्या आयफोन 13 मध्ये देण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे. (Iphone 12 vs Iphone 13 : Which model should you prefer to buy)

स्टोरेज आणि रॅमच्या बाबतीत आयफोन त्यांच्या स्पर्धक कंपन्यांच्या मागे होता. 20 ते 35 हजार रुपयांच्या प्राईस रेंजमध्ये वनप्लस, शाओमी, सॅमसंग या कंपन्या 6 जीबी, 8 जीबी रॅम असलेलेले, 128 जीबी आणि त्याहून अधिक स्टोरेज स्पेस असलेले स्मार्टफोन लाँच करत आहेत. दुसऱ्या बाजूला पल कंपनी मात्र 64 आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस असलेले आयफोन लाँच करत होती. तसेच आयफोनच्या किंमती देखील जास्त असल्याने अनेक ग्राहकांनी आपला मोर्चा वनप्लस आणि सॅमसंग कडे वळवला. त्यामुळे कंपनीने आयफोन 13 सादर करताना ग्राहकांच्या या मागणीकडे गांभीर्याने पाहिले. त्यामुळेच कंपनीने आयफोन 13 मध्ये 1 टीबीपर्यंत स्टोरेज स्पेस दिली आहे. आयफोन 13 प्रो, आयफोन 13 प्रो मॅक्स या दोन व्हेरिएंट्समध्ये कंपनीने 1 टीबीपर्यंतची स्टोरेज स्पेस दिली आहे. तसेच अ‍ॅपलने यामध्ये 521 आणि 256 जीबी स्टोरेज असे दोन वेगळे पर्यायदेखील दिले आहे.

iPhone 13 मध्ये 6.1 इंचांची OLED स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये फोटोग्राफीसाठी डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यामध्ये 12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, जी अल्ट्रा वाईड लेन्स आहे. हा फोन IP68 वॉटर रेझिस्टंट सह येतो. या फोनची किंमत 79,900 रुपये इतकी आहे. यात नवीन A15 बायोनिक चिप, रिडिजाइन केलेले कॅमेरा मॉड्यूल आणि 120Hz रिफ्रेश रेटसह दमदार डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन 13 सिरीज एक वाईड नॉच, IP68 रेटिंग, मेटल-ग्लास बॉडी आणि फेस आयडी बायोमेट्रिक सिस्टम सह येतो. आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 मध्ये 12MP प्रायमरी सेन्सर आहे आणि रियर कॅमेरा 12 एमपीच्या अल्ट्रा-वाइड लेन्ससह आहे. दोन्ही प्रो मॉडेल मागील बाजूस ट्रिपल कॅमेरासह येतात.

iPhone 13 mini

केवळ स्क्रीन साईज आणि बॅटरी लाईफ या दोन गोष्टी वगळल्या तर हा फोन आयफोन 13 सारखाच आहे. या फोनची किंमत 69,900 रुपये इतकी आहे. यात 5.4 इंचांचा एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. मिनी व्हेरियंटमध्ये 5.4-इंच फुल एचडी+ (1080 × 2340 पिक्सल) ओएलईडी स्क्रीन आहे, तर आयफोन 13 आणि 13 प्रो मध्ये 6.1-इंच फुल एचडी+ (1170 × 2532 पिक्सल) ओएलईडी डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 120Hz, 6.7-इंच फुल-एचडी+ (1284 × 2778 पिक्सेल) OLED पॅनल आहे.

IPhone 12 आणि iPhone 12 Mini

तुमचं बजेट कमी असेल तर अजूनही तुमच्याकडे iPhone 12 आणि iPhone 12 Mini असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. iPhone 12 64GB स्टोरेज सह येतो. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला आयफोन 13 च्या तुलनेत इथे थोडी तडजोड करावी लागेल. या फोनची स्क्रीन साईज 6.1 इंच इतकी आहे. या फोनची किंमत 65,900 रुपयांच्या आसपास आहे. आयफोन 12 मिनी हा फोन आयफोन 12 पेक्षा फार वेगळा नाही. या फोनची स्क्रीन साईज आणि बॅटरी लाईफ आयफोन 12 च्या तुलनेत थोडी कमी आहे. या फोनची किंमत 55 हजार रुपयांच्या आसपास आहे.

नवीन iPad मिनीचे फीचर्स

आयपॅड मिनीमध्ये टॉप बटन म्हणून टच आयडीसह 8.3 इंच स्क्रीन आहे. मागील पिढीच्या आयपॅड मिनीच्या तुलनेत Apple 40 टक्के वेगवान सीपीयू परफॉर्मन्स आणि जीपीयू कामगिरीमध्ये मोठी उडी घेण्याचे आश्वासन देत आहे. हे A13 बायोनिक चिपसेटवर देखील चालते. IPad मिनीमध्ये आता USB-C पोर्ट आहे. आपण ते आपल्या कॅमेरा, लॅपटॉप तसेच इतर कोणत्याही डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. तसेच आयपॅड 5G ला सपोर्ट करतो. IPad आयपॅड मिनीचा मागचा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे ज्यात 4 के मध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे. त्याची प्रारंभिक किंमत $ 499 (36,742 रुपये) सुरु होते.

अ‍ॅपल आयफोन 13 सिरीजमधील स्मार्टफोन्स आणि त्यांच्या किंमती

अ‍ॅपल आयफोन 13 मिनी

  • अ‍ॅपल आयफोन 13 मिनी १२८ जीबी – 69,900 रुपये
  • अ‍ॅपल आयफोन 13 मिनी २५६ जीबी- 79,900 रुपये
  • अ‍ॅपल आयफोन 13 मिनी 512 जीबी – ९९,900 रुपये

अ‍ॅपल आयफोन

  • अ‍ॅपल आयफोन 13 128 जीबी- 79,900 रुपये
  • अ‍ॅपल आयफोन 13 256 जीबी- 90,900 रुपये
  • अ‍ॅपल आयफोन 13 512 जीबी- 1,09,900 रुपये

अ‍ॅपल आयफोन 13 प्रो

  • अ‍ॅपल आयफोन 13 प्रो 128 जीबी- 1,19,900 रुपये
  • अ‍ॅपल आयफोन 13 प्रो 256 जीबी- 1,29,900 रुपये
  • अ‍ॅपल आयफोन 13 प्रो 521 जीबी- 1,49,900 रुपये
  • अ‍ॅपल आयफोन 13 प्रो 1 टीबी – 1,69,900 रुपये

अ‍ॅपल आयफोन 13 प्रो मॅक्स

  • अ‍ॅपल आयफोन 13 प्रो मॅक्स 128 जीबी- 1,29,900 रुपये
  • अ‍ॅपल आयफोन 13 प्रो मॅक्स 256 जीबी- 1,39,900 रुपये
  • अ‍ॅपल आयफोन 13 प्रो मॅक्स 521 जीबी- 1,59,900 रुपये
  • अ‍ॅपल आयफोन 13 प्रो मॅक्स 1 टीबी – 1,79,900 रुपये

तुम्ही जर आयफोन खरेदीचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की, कोणतंही नवीन आयफोन मॉडेल लाँच झाल्यानंतर त्याआधीच्या मॉडेलची किंमत कमी होते. त्यामुळे आगामी काळात आयफोन १२ ची किंमत आणखी कमी होऊ शकते. किंवा कंपनी त्यावर अधिकाधिक डिस्काउंट ऑफर्स सादर करु शकते.

इतर बातम्या

Twitter, Google, Microsoft ते Adobe… टॉप टेक कंपन्यांची कमान भारतीयांकडे, सिलिकॉन व्हॅलीतला दबदबा वाढतोय

50MP कॅमेरा, 8 GB रॅमसह Redmi Note 11T 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

फोन बिघडल्यावर दुरुस्तीसाठी कंपनीचा सर्व्हिस मॅनेजर घरी येणार, सेवा पूर्णपणे मोफत

(Iphone 12 vs Iphone 13 : Which model should you prefer to buy)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.