ना 128GB, ना 256GB, आयफोन 13 मध्ये 1000GB स्टोरेज मिळणार, कसा असेल नवा स्मार्टफोन?

बहुप्रतीक्षित Apple iPhone 13 यावर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. (iPhone 13 could be launched in September 2021)

ना 128GB, ना 256GB, आयफोन 13 मध्ये 1000GB स्टोरेज मिळणार, कसा असेल नवा स्मार्टफोन?
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 4:03 PM

मुंबई : बहुप्रतीक्षित Apple iPhone 13 यावर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. फोनची लाँचिंग डेट जसजशी जवळ येत आहे, तसतसे या फोनची स्पेसिफिकेशन्सही लीक होत आहेत. नुकतीच अशी माहिती मिळाली आहे की, आयफोन 13 सिरीज मोठ्या स्टोरेज कॉन्फिगरेशनसह लाँच केली जाऊ शकते. अहवालात असे समोर आले आहे की, आयफोन युजर्सना आयफोन 13 मध्ये 1 टीबी म्हणजेच 1000 जीबी स्टोरेज स्पेस मिळू शकते. आयफोन कंपनीला स्टोरेजवरुन नेहमीच युजर्सकडून टीका सहन करावी लागली आहे. त्यामुळेच कंपनी यावेळी अँड्रॉयड युजर्सपेक्षा अधिक स्टोरेज स्पेस देऊ शकते. तसेच या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्डचा पर्याय नसेल. युजर्सना एस डी कार्डची गरज भासायला नको, असा कंपनीचा उद्देश आहे. (iPhone 13 may come with 1TB storage option; know more about it)

काउंटरपॉईंट रिसर्चनुसार, हुआवेनंतर Apple ही दुसरी अशी कंपनी आहे, ज्या कंपनीवर स्टोरेजवरुन दबाव निर्माण केला जात आहे. जर आपण स्मार्टफोन उद्योगाबद्दल चर्चा केली तर आता प्रत्येक कंपनी 100 जीबीपेक्षा जास्त स्टोरेज देते. त्यामुळे आयफोनच्या 128 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोन्सना ग्राहकांकडून पसंती मिळतेय. त्या तुलनेत 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट्सना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. परिणामी अॅपलला त्यांच्या फोनची स्टोरेज क्षमता वाढवणे भाग पडले आहे.

सध्या आयफोनमध्ये युजर्सना सर्वाधिक स्टोरेज स्पेस आयफोन 12 प्रो मॉडेलमध्ये मिळते. या फोनमध्ये 512 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. 9to5 मॅक अहवालानुसार, आता कंपनी ही स्टोरेज स्पेस 1000 जीबीपर्यंत वाढवू शकते, जी यावर्षी आयफोन 13 मध्ये दिली जाऊ शकते. 9to5 मॅकद्वारे एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार 70 टक्के युजर्सनी असे म्हटले आहे की, आयफोन 13 हा स्मार्टफोन 1 टीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला तर तो इतर सर्व ब्रँड्सना मागे टाकू शकेल. तसेच हा फोन युजर्सनादेखील खूप आवडेल. तर 12 टक्के युजर्सनी असे म्हटले आहे की, अॅपलने असे केल्यास ते लवकरच हा फोन खरेदी करतील.

Apple चं Xiaomi, OnePlus पावलावर पाऊल

Apple आता शाओमी एमआय 11 अल्ट्रा (Xiaomi Mi 11 Ultra) आणि वनप्लस 9 प्रो (OnePlus 9 Pro) या अँड्रॉइड फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या पावलावर पाऊल टाकणार आहे. कंपनी iPhone 13 Series 12Hz ProMotion डिस्प्लेसोबत लाँच करु शकते. MacRumors ने DigiTimes च्या रिपोर्टचा हवाला देत म्हटले आहे की, अॅपल iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max साठी LTPO (लो-टेम्परेचर पॉलिक्रिस्टलाइन ऑक्साइड) डिस्प्लेचा वापर केला जाणार आहे. सॅमसंग आणि एलजी डिस्प्ले LTPO OLED पॅनलचे प्रमुख सप्लायर्स आहेत. दुसऱ्या बाजूला vanilla iPhone 13 आणि iPhone 13 mini स्मार्टफोन 60Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह लाँच केले जाऊ शकतात.

डिस्प्लेमध्ये बदल

iPhone 13 ची एक इमेज समोर आली आहे. iPhone 13 चा डिस्प्ले नॉच पूर्वीपेक्षा लहान असेल. असंच डिझाईन iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max या सर्वच स्मार्टफोन्समध्ये दिलं जाणार आहे. iPhone 13 आणि iPhone 13 Pro मध्ये 6.1 इंचांचा डिस्प्ले दिला जाईल. तर iPhone 13 Pro Max मध्ये 6.7 इंचांची स्क्रीन दिली जाऊ शकते. तसेच iPhone 13 mini स्मार्टफोन iPhone 12 mini प्रमाणे 5.4 इंचांच्या डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो.

या स्मार्टफोन्सबद्दलच्या अहवालानुसार, आयफोन 13 प्रो चा नॉच 5.35 मिमी लांबीसह दिला जाऊ शकतो, तर आयफोन 12 प्रोमध्ये हा नॉच 5.30 मिमी लांबीसह आहे. दुसरीकडे, आपण जर या फोनच्या रुंदीबद्दल बोलायचे झाल्यास या नवीन आयफोनची रुंदी 26.8 मिमी इतकी असेल, तर आधीच्या आयफोन 12 प्रोची रुंदी 34.83 मिमी इतकी होती.

नव्या Iphone मध्ये पंचहोल डिझाईन मिळणार

आयफोन एक्स मध्ये नॉच सादर केल्यानंतर, आयफोनचा नॉच थोडा लहान केला जाणार आहे. नॉच लहान करण्यासाठी कंपनीने ईयरपीस टॉप बेजेल वरच्या बाजूला सरकवलं आहे. असं म्हटलं जातंय की, अॅपल कंपनी 2022 मध्ये काही ठराविक iPhone मॉडेल्समध्ये पंच होल डिझाईन देऊ शकते. जो Samsung Galaxy S21 Ultra प्रमाणे असेल. तसेच फेस आयडीऐवजी कंपनी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देऊ शकते. कंपनी iPhone 13 सिरीज फास्टर A15 चिप, इम्प्रूव्ह्ड कॅमेरा आणि मॅट ब्लॅकसह नवीन रंगांमध्ये सादर करु शकते.

इतर बातम्या

6000mAh बँटरी, 108MP कॅमेरासह Moto G60 आणि Moto G40 लाँच, किंमत…

6GB/128GB, क्वाड कॅमेरासह POCO M2 Reloaded बाजारात, उरले फक्त काही तास

3GB/64GB, 6,999 रुपयात खरेदी करा 6000 mAh बॅटरीवाला फोन, अमेझॉनवर पहिला सेल

(iPhone 13 may come with 1TB storage option; know more about it)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.